भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषण pandit javaharlal neharu
तर आज दिनांक १४ नोव्हेंबर २०१० विद्यार्थी मित्रांनो आपणांस माहितच आहे की आपण सर्व आज एकत्र कशा करिता जमलो आहोत.
आज मी ‘बालदिवस’ यावर दोन शब्द सांगत आहे. तरीपण अध्यक्ष महोदय व या कार्यक्रमात बसलेले माझे गुरूजन तसेव विद्यार्थी मित्र आपण हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिनानिमित्त
बाल दिवस १४ नोव्हेंबर ला प्रत्येक वर्षी साजरा करतो.
तर मित्रांनो आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४-११-१८८९ या वर्षी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे सुध्दा स्वतंत्र चळवळीत सिंहाचा वाटा
होता. पोशाख व हलका आहार त्यांना आवडत असे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर पंडितजींनी पुढचे शिक्षण के ब्रीजच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून घेतले व १९१२ ला ते एल.एल.बी. बॅरिस्टर ही. पदवी घेऊन भारतात परतले.
मित्रांनो गुलाबाचे फूल कोणाला आवडत नाही. पंडितजींना आपल्या कोटमध्ये गुलाबाचे फूल लावणे आवडायचे. लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणात असत. वकीलकी सुरू असताना लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. महात्मा गांधींच्या कार्यामुळे त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता. म्हणूनच त्यांनी गांधीजींना आपले गुरू मानले. सुभाषचंद्र बोस व पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी एकत्र येवून युवक वर्गाच्या इच्छा आकांक्षाकडे विशेष लक्ष दिले. अनेकदा त्यांना तुरूंगात राहावे लागले. १९३१ या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ‘चले जाव’ या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. ‘मारू किंवा मरू’ अशी त्यांनी प्रतिज्ञा केली.
विद्यार्थी मित्रांनो पंडितजींचे वडील मृत्यूसमयी त्यांना म्हणाले की, तुम्ही व तुमचे सर्व सहकारी स्वतंत्र मिळविल्या शिवाय राहणार नाही. परमेश्वर ती प्रेरणा तुम्हाला निश्चित देईल असे सांगून त्यांनी १९३१ या वर्षी जगाचा निरोप घेतला. एवढा मोठा शोक त्यांना सहन करावा लागला. पंडितजींच्या जीवनावर बोलायला फार महत्वाचे प्रसंग आहोत. पंडीतजींची पत्नी कमलाबाईने सुध्दा स्वतंत्र संगामात
उडी घेतली. ९ ऑगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ ची मोहिम काढली. इंग्रजांनी कायमचे ह्या भारतातून निघून जावे हिच अट त्यांना होती व ती पुर्ण झाली. १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. लोक मुक्तपणे श्वास घेऊ लागले. देश स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली व भारतावर तिरंगा झेंड्याची स्थापना, पूजा करू लागले. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना निवडून आणले.
मित्रांनो, बाल दिवस या नात्याने मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, पंडितजी म्हणत होते मुलं ही देवाघरची फुले आहेत. त्यांना लहान मुले फार आवडत होती व ते लहान मुलांवर प्रेमच इतके करत होते. एकदा त्यांनी मुंबईला शिवाजी पार्कवर दिड लाख मुलांचा विशाल मेळावा भरविला होता. त्यावेळी मुलांनी त्यांना निमंत्रण दिले. आपले महत्वाचे काम काही वेळेपुरते सोडून पंडितजी मुलांच्या कार्यक्रमात हजर राहिले होते. मुलं विचार करीत होते की पंडितजीच्या गळ्यात हार कसा घालावा ते पाहून पंडितजींनी त्यांच्या जवळचा हार स्वतःच वाकून गळ्यात घातले होते. काही मुलांकरिता ते खाली मान वाकवत होते. मुलाच्या टाळ्यांना पंडितजी हसत राहायचे याच त्यांच्या आठवणी मूळे आज बाल दिवस म्हणून साजरा करतो.
भारताची राजकीय अर्थव्यवस्था व संपूर्ण देश एका लिखित योजनेत चालावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार केले व सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वाधीन केले. १५ ऑगस्ट १९६४
या १३ वर्षाच्या कालखंडात त्यांनी पंतप्रधान या पदावर राहून या भारत देशाचा जगात मान वाढविला. अनेक राष्ट्राचे लोक त्यांना ओळखत होते. राजकीय विषयावर चर्चा करतांना भारताची बाजू आपल्या प्रभावाने ते अचूक पटवून देत असत्. १७ मे १९६४ रोजी २.३० वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो. व ह्या बाल दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देवून मी माझे भाषण संपले. असे जाहिर करतो
जय हिंद जय भारत……..









