सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुरविण्यात आलेले संगणकीय साहित्य निर्लेखित करणेबाबतच्या सूचना computer sahitya nirlekhan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुरविण्यात आलेले संगणकीय साहित्य निर्लेखित करणेबाबतच्या सूचना computer sahitya nirlekhan 

संदर्भ :-

1) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. मातंस / नस्ती 07/प्र.क्र. 89/39, दि. 01/08/2011.

2) शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे पत्र क्र. सशिअ / संगणक / 118/2019, दि. 06/06/2019.

3) शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, जळगांव यांचे पत्र क्र. शिक्षण/सशिअ / संगणक/आरआर/18/2019-20, दि. 11/06/2019,

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2003-04 पासून जिल्हा, तालुका, महानगरपालिका व शाळा यांना संगणकीय साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. सदर पुरवठा करण्यात आलेले संगणकीय साहित्यांचे आयुर्मान ५ वषर्षापेक्षा जास्त झाल्याने ते शाळांमध्ये कालबाह्य होऊन बंद पडत असल्याबाबत उस्मानाबाद व जळगांव जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे. यासंदर्भात जिल्हा कार्यालयाकडून निलेखित करण्याकरिता मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व जिल्हा /महानगरपालिका / तालुका / शाळा स्तरावर पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्र शासनांतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १ ऑगस्ट, २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणाची विल्हेवाट लावण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार जिल्हा तालुका/ महानगरपालिका/ शाळा स्तरावरुन कालबाह्य झालेल्या संगणकीय साहित्याची निर लेखनाची कार्यवाही करण्यात यावी .

तसेच निर लेखनातून प्राप्त झालेले रक्कम समग्र शिक्षा च्या खात्यामध्ये जमा करावी आणि निर्लेखित केलेल्या संगणकीय साहित्याची नोंद साठा नोंदवही मध्ये नोंदविण्यात यावी निर्लेखित केलेल्या संगणकीय साहित्याच्या कार्यवाहीचा अहवाल जिल्ह्यातील संगणक प्रोग्रामर यांनी एकत्रित करून शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या स्वाक्षरीने या कार्यालयास सादर करण्यात यावा.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment