राजमाता जिजाऊ जयंती निमित्त छोटे व सोपे मराठी भाषण rajmata jijau jayanti
मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडवले शूर शिवबांना !
साक्षात होत्या त्या आई भवानी, ज्यांच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी !
सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र – मैत्रिणीनों….
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे व तसेच माझे गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्यासमोर एक आदर्श माता राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा ! मानाचा मुजरा !!
मित्रहो, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न
बघितले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अनेक पराकाष्टा केल्या त्या थोर माता म्हणजेच स्वराज्य जननी जिजामाता.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लघुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. सन १६०५ मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
राजमाता जिजाऊंना प्रतापवीर संभाजीराजे व छत्रपती शिवाजी अशी दोन पुत्ररत्ने होती. राजमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्पनेचे बीज शिवरायांच्या मनात पेरले. “तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे” असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केला.
त्यादृष्टीने त्या बालपणापासूनच शिवरायांना रामायण-महाभारतातील शौर्य कथा सांगत. त्याच बरोबर तलवारबाजी, गनिमी कावा, घुडस्वारी, दांडपट्टा फिरवणे, विद्या कौशल्य इ. युध्दकला शिकवत. त्यांनी शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम अशा राजस सत्वगुणांचे बाळकडू शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी शिवरायांना अनेक कठिन प्रसंगात खंबीरपणे मार्गदर्शन केले. शिवबा मोहिमेवर असता त्या राज्यकारभार पाहत, न्यायनिवाडे करत तसेच गरजूंना मदत करत असत.
अखेर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी १७ जून १६७४ रोजी राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. अशा या थोर मातेस माझे कोटी कोटी प्रणाम !
एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र








