पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत pavitra portal shikshak bharti
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीआरई-१७१३/(८६/१३)/प्राशि-५, दि. १९.०६.२०१३.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र. १४९/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. १०६/टीएनटी-१, दि. १०.११.२०२२.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ५०९/टीएनटी-१, दि. १३.१०.२०२३.
प्रस्तावना :
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपध्दती संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतूदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पध्दतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि, काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतूदी अधिक्रमित करुन सुधारित तरतूदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :
खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीशी संबंधित तरतूदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतूदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार करावयाच्या पदभरतीसंदर्भातील स्विकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी, तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी नुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील.
३. संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयातील तरतूदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतूदी ह्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करु इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१२०१२३९०२९५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,









