हॉकीचे जादूगार – मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण / निबंध magician of hockey major dhyanchand 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हॉकीचे जादूगार – मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण / निबंध magician of hockey major dhyanchand 

आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आणि त्या हॉकी खेळाचे जादूगार असलेले मेजर ध्यानचंद हे देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान होते. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे बॉल आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता.

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद येथे राजपूत घराण्यात झाला. इयत्ता सहावीपर्यंत शिकलेले ध्यानचंद यांचे नाव भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही तितक्याच आदराने व मानाने घेतले जाते. सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली. त्याआधी त्यांना हॉकी खेळण्याचा काहीच अनुभव नव्हता.

मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते, मात्र ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करायचे, त्यामुळे कालांतराने त्यांच्या मित्रांनी

ध्यानसिंग” यांच्यापुढे चंद हा शब्द जोडला. तेव्हापासून “ध्यानचंद” या नावाने ते ओळखले गेले. ड्रिब्लिंगमधील त्यांचे कर्तृत्त्व इतके सुरेख होते की, चेंडू लोह चुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होत होता. असाच प्रेक्षकांचा व खेळाडूंचा समज असायचा. ध्यानचंद यांनी आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौऱ्यात एकूण २१ सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले. त्यातील १०० गोल करण्याचे रेकॉर्ड एकट्या ध्यानचंद यांच्या नावावर सुवर्ण अक्षराने कोरले गेले. १९२८ साली झालेल्या ऑलिंपिक हॉकीत भारताला अजिंक्य करण्यातही ध्यानचंद यांचाच सिंहाचा वाटा होता.

ध्यानचंद यांच्या खेळण्याच्या प्रवासात अनेक घटना घडल्या. यातील एक म्हणजे, ४ ऑगस्ट १९३६ च्या ऑलिम्पिंक मध्ये जेव्हा भारत-जर्मनी सामना रंगला होता, तेव्हा आपल्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी हिटलर तेथे हजर होते. पहिल्या फेरीमध्ये भारत १-० या फरकाने पुढे होता. तेव्हा दुसऱ्या फेरी आधी जर्मनीच्या काही विशेष अधिकाऱ्यांनी मैदान गरजेपेक्षा जास्त ओले केले, जेणे करुन भारतीय खेळाडूंची सुस्त बुद्धी तेथे टिकणार नाही. पण त्यावेळी ध्यानचंद यांनी एक युक्ती

केली. त्यांनी आपल्या। पायातील बूट काढून टाकले. बूट काढल्यामुळे त्यांच्या पायाची पकड मजबूत झाली व त्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक असे ७ गोल केले व सामना आपल्या नावावर केला. त्यांच्या या विवेकबुद्धीला हिटलर यांनी सलाम केला. बा

मेजर ध्यानचंद यांच्या असामान्य कौशल्याने भारावलेला हुकूमशहा हिटलर यांनी ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्त्व देण्याची तसेंच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु मेजर ध्यानचंद यांनी तो फेटाळला होता. कारण त्यांचे स्वप्न फक्त भारतासाठीच खेळण्याचे होते. देशप्रेम व देशाप्रती स्वाभिमान त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेला होता.

हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतांनाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करुन देशाला पहिले ऑलिम्पिंक पदक जिंकून दिले. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिंक मध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. “हॉकी हा सांघिक खेळ आहे. तो संघ भावनेनेच खेळला पाहिजे.” असे त्यांचे मत होते. म्हणूनच चेंडूवर विलक्षण नियंत्रण असूनही ते आपल्या

सहकाऱ्यांना अचूक पास द्यायचे. हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना हॉकीतील “जादूगार” असे म्हटले जायचे.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादूई खेळाने देशाला १९२८ (अॅमस्टरडॅम), १९३२ (लॉस अँजेलीस) तर १९३६ (बर्लिन) अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. २९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यांत येते. खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो.

आपल्या कारकीर्दीत, खेळात असामान्य कर्तृत्त्व दाखविण्यात व निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रिडापटूला “ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यांत आले.

Related posts:

Leave a Comment