राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण marathi speech on rajarshi shahu maharaj jayanti bhashan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण marathi speech on rajarshi shahu maharaj jayanti bhashan 

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर राजमाने आजच्य कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माजी बाल मित्रांनो आज आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती पूर्ण देशांमध्ये साजरी केली जाते आज आपल्या शाळेमध्ये देखील अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करत आहोत

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! आज या दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट मी आपणा समोर सादर करणार आहे.

महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सश्याच्या कानाला धरून दूर उभा राहीलेला महाराजांना दिसला. महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं, पारधी म्हणाला, ‘म्हाराजा, आपल्यासाठी मी ह्यो ससा मारून आणलाय. याचं कोरड्यास करुन जेव.’ हुजऱ्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं. दूपारी महाराजांच्यासह सगळे जण जेवायला बसले.

इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली. तो कुठं दिसेना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली. पारध्याला शोधून त्याला महाराजांकडं आणण्यात आलं.

महाराज पारध्याकडे पहात हुजऱ्यांना म्हणाले, “याला पान करून जेवायला बसवा.”

इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला, “महाराज याला कोठे बसवू? त्या झाडाखाली ?”

महाराज म्हणाले,” याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसवू का म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव.”

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.

माझे शब्द येथे संपवतो,

जय हिंद, जय महारष्ट्र

Related posts:

Leave a Comment