परीक्षा पे चर्चा – ९ (PPC-२०२६) प्रचार व प्रसाराबाबत pariksha pe charcha prasar
संदर्भ :-१.
मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र डीओनं २-६/२०२५ पीपीसी दि.०१/०२/२०२६.
२. संचालनालायचे पत्र क्र.शिसं/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा ९-२०२६/ए-२/विद्याशाखा/५९६७ दि.०३/०२/२०२६.
३. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र डीओनं २-६/२०२५ पीपीसी दि.०३/०२/२०२६.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक २ मधीन सूचनांनुसार तसेच संदर्भक्रमांक ३ च्या केंद्रशासनाच्या पत्रान्वये परीक्षा पे चर्चा (पीपीसी २०२६) च्या ९ व्या आवृत्तीचा मुख्य कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विविध सोशल मीडिया (यूट्युब, फेसबुक लाईव्ह, इ.) दूरदर्शन, पीएम ई-विद्या टीव्ही, रेडिओ चॅनेल आणि नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ इत्यादी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे. त्याची लिंक आपणांस यथावकाश कळविण्यात येईल, असे संचालनालयास सूचित केले आहे. (सोबत केंद्रशासनाच्या संदर्भीय क्रमांक ३ च्या पत्राची प्रत जोडली आहे.)
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरून सर्व संबंधितास परीक्षा पे चर्चा (पीपीसी-२०२६) मध्ये जास्तीत जास्त विद्याथ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी हा कार्यक्रम विविध सोशल मीडिया (यूटयुब, फेसबुक लाईव्ह, इ.) दूरदर्शन, पीएम ई-विद्या टीव्ही, रेडिओ चॅनेल आणि नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ इत्यादी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित दिनांक ०६/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पाहण्यासाठी सूचित करण्याची नोंद घ्यावी.
Creatives Link-https://drive.google.com/drive/folders/12LrNmniFQIwPJ4oUAQJThUkY9LS9FbgA?usp=share
link Creatives Link –https://x.com/eduminofindia/status/2018953537959649749?s=46










