माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत practical online mark’s 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत practical online mark’s

संदर्भ- या कार्यालयाचे पत्र क.रा.मं./परीक्षा-७/९३ दि.०९/०१/२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण व श्रेणी भरणेसंबंधी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१. फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना “I.A. MARK” ही लिंक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर Login मधून भरण्याची सुविधा पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर गुण नोंदविताना त्याची पूर्णतः गोपनीयता राहील याची सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी.

२. माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधीत विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकीटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून तक्त्यात नमूद केल्यानूसार निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.

३. अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्र भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक कमांक (Additional Seat No.) उपलब्ध झालेले नाहीत अथवा विद्यार्थ्यांनी ऐनवेळी विषय बदल केला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पध्दतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळामध्ये जमा करावयाचे आहेत.

४. गतवर्षीप्रमाणेच सर्व विभागीय मंडळांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी ‘आऊट ऑफ टर्न’ ने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित करण्यात याव्यात.

५. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक कमांक सदर ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध करुन दिले जातील, सदर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पध्दतीने “Out of Turn marks” या Option व्दारे नोंदविण्याची कार्यवाही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्त पध्दतीप्रमाणेच Maker व Checker Login चा वापर करुन करावयाची आहे.

६. संदर्भिय पत्रामधील सूचना क.५ नुसार माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांचे नाव, आईचे नाव व इतर दुरुस्त्या पुढील कालावधीमध्ये विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठवावयाच्या आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा दि. १३/०२/२०२६ ते दि.३१/०३/२०२६

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दि.२०/०२/२०२६ ते दि.३१/०३/२०२६

सदर कालावधीनंतर सदर दुरुस्त्यांसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध राहणार नाही.

उपरोक्त प्रमाणे सदर सूचना व ONLINE गुणांसंदर्भातील सर्व बाबी आपल्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. तसेच ऑनलाईन पध्दतीने गुण भरुन मंडळाकडे कशाप्रकारे पाठवावयाचे आहेत याबाबतच्या सर्वसाधारण सूचना या पत्रासोबत देण्यात येत आहेत. सदर सर्वसाधारण सूचना सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्याबाबत पुढील उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च-२०२६ प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती.

१. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय/शाळा यांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील I.A. Marks या Link व्दारे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापनाचे गुण/श्रेणी मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.

२. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) हा अनुक्रमे प्राचार्य/मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Checker म्हणून काम करावयाचे आहे.

३. या मुख्य Login Id मधून कमीतकमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार Maker User (गुण नोंद करणारा) तयार करणे आवश्यक राहील. त्याकरीता मुख्य Login मधील Users Link मधून Users Add करावा, त्याकरीता संबधीत User चे नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल ची आवश्यकता आहे. तद्नंतर त्याखालील Maker and Checker Link वरून त्या User ला Maker असा Role Assign करणे गरजेचे आहे. तसेच नव्याने add केलेल्या User चा Password हा त्याच्या नोंदविलेल्या Email वर प्राप्त होईल. (मुख्य Inbox मध्ये E-mail प्राप्त न झाल्यास Spam Folder मध्ये सुध्दा पहावे.)

४. Maker Login मध्ये विषय निहाय / माध्यम निहाय त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्याची कोरी पृष्ठे (Blank Marksheet) प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील.

५. विषयनिहाय प्रात्यक्षिक /अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर (Blank Marksheet) बैठक क्रमांकानुसार (Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेऊन Maker Login मधून त्याची Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका विषयाच्या सर्व गुणांची/श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता “Send for Approval to checker” हा option Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठे ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता येतील, अशाप्रकारे सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत.

६. Checker User ला इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) त्याचे Login मध्ये Maker User ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks/Grade या Option मध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या/श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य (approve) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर “Send for Board Approval” हा Option Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.

७. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.

८. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देवू न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी सदरची परीक्षा ऑउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.

९. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेल्या आहेत अशाच विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळांना उपलब्ध करून दिले जातील. सदर विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन पध्दतीने “Out of Turn marks” या Option द्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती प्रमाणेच Maker व Checker Login चा वापर करून करावयाची आहे.

शासन परिपत्रक pdf download 

१०. अतीविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत, अथवा विषयबदल केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारीत तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.

Related posts:

Leave a Comment