आदरणीय साने गुरूजी यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषण sane guruji marathi bhashan
आज दि.09 डिसेंबर 2025 रोजी मंगळवार, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही कार्यक्रम म्हटले तर अध्यक्षांची फार गरज असते. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री……………. तसेच माझे वर्गशिक्षक, खाली शांतपणे बसलेले माझे प्रिय विद्यार्थी, विद्यार्थीनी मित्रांनो!
मी आज आपल्या समोर आदरणीय साने गुरुजी यांच्या जीवनावर दोन शब्द थोडक्यात आपणा सर्वाना सांगणार आहे.
कृपया लक्ष द्यावे. संपूर्ण जगाला मानवधर्म शिकवणारे साने गुरूजीचे संपूर्ण नाद पांडुरंग सदाशिव साने होते. मित्रांनो त्यांचा जन्म कोकणातील पालगड या गाव सन २४ डिसेंबर १८९९ ला झाला. मित्रांनो साने गुरूजींच्या आईंचे नाव यशोदा होते. त्यांच्या आईने लहानपणीच त्यांना चांगले संस्कार दिले होते. त्यांनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. मित्रांनो बी.ए आणि एम.ए. झाल्यावर साने गुरूजीनी अमळनेर मध्ये प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकांची नोकरी केली.
विद्यार्थी मित्रांनो ते काही साधे शिक्षक नव्हते त्यांनी आपल्या शब्दांच्या जादूने संपूर्ण वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोहित करून सोडले. व १९२८ मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केले होते. मित्रांनो तो काळ म्हणजे आपला भारत देश इंग्रजांच्या ताव्यात होता. त्यांच्यावर महात्मा गांधीचा राजकीय प्रभाव होता. आतापयंत असा एकही शिक्षक आपण पाहिले नाही की त्यांनी स्वतःच्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला असेल पण साने गुरूजींनी ते करून दाखविले होते. अनेकदा त्यांना तुरूंगात जावे लागले. मित्रांनो तुरूंगात असताना त्यांनी खालील कविता लिहिली.
बलसागर भारत होवो।
विश्वात शोभूनी राहो ।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
मी सिध्द मरायाला हो।।
विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपण मरेपर्यंत विसरणारं नाही ही कविता राष्ट्रीय एकता, राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. सयाने गुरूजींनी अनेक अडचणींवर मात केली. अनेक अत्याचार सहन करून उत्कृष्ट साहित्यिक झाले. “श्यामची आई” ही सुप्रसिध्द कांदबरी त्यांनी नाशिक येथे तुरूंगात असतांना लिहिली. या महान क्रांतिकारी शिक्षकाला विनम्र अभिवादन!
अशा महान आत्म्याला व क्रांतीकारी गुरुजीला मी कोटी कोटी प्रमाण करतो व माझे भाषण इथेच संपले असे जाहीर करतो.
जयहिंद जय महाराष्ट्र………………









