संकलित चाचणी-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविणेबाबत sanklit chachni pat chat bot 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संकलित चाचणी-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविणेबाबत sanklit chachni pat chat bot

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-३८.०/१६/२०२६/EVALUATION /१७६८८५३/२०२६ दि.०९/०३/२०२६.

समग्र शिक्षा अंतर्गत QUALITY INTERVENTION (५.३.१ funds for Quality (LEP) Innovation Guidance अंतर्गत Competency Based Periodical Assessment (PAT) सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-२ (PAT-३) चे आयोजन दि. ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात येत आहे.

प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची संकलित चाचणी-२ (PAT-३) घेण्यात येत आहे. सदर संकलित चाचणी-२ (PAT ३) च्या चाचणीपत्रिका___ शिक्षकांनी तपासण्यांबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांनी दिलेल्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट संकलित चाचणी-२ (PAT-३) गुण यावर भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित चाचणी-२ (PAT-३) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. संकलित चाचणी-२ (PAT-३) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेंकरिता जिल्ह्यांना दि. १६ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

संकलित चाचणी-२ चे (PAT-३) गुणांची नोंद करणेसाठी लिंक- https://be/PAT-MU

तथापि, उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल, त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित चाचणी-२ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे, तसेच ज्या शाळांमध्ये संकलित चाचणी-२ (PAT-३) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी, चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) आपला प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ असणाऱ्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे, तसेच सदर संकलित चाचणी-२ ची गुणनोंद ही दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत चॅटबॉटवर होणे अपेक्षित आहे. याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.

 

Related posts:

Leave a Comment