शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करणेबाबत shala swachhata pandharvada sajara shasan paripatrak
संदर्भ:- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.F.२७-२/२०२५-१९-९, दि.३०/०७/२०२५
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत सन २०१६ पासून दरवर्षी देशातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असते हे आपणांस ज्ञातच आहे. यासाठी शिक्षा मंत्रालयाच्या सबंधित स्वायत्त संस्थांच्या सहकार्याने आणि राज्यातील, जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांच्या सहकार्यामुळे स्वच्छता पंधरवडा ही एक यशस्वी जन चळवळ निर्माण झाली आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी लाखो मुले, इतर संस्था आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे स्वच्छ भारत घडविण्यात शाळांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल शासनाच्या सर्वोच्च स्तरावर घेण्यात आली आहे.
२ सन २०२५ हे स्वच्छता पंधरवडा अंमलबजावणीचे सलग १० वे वर्ष आहे. मंत्रिमंडळ सचिवालय व आणि जलशक्ती मंत्रालय, (पेयजल व स्वच्छता विभाग), भारत सरकार यांनी उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये निर्गमित केलेल्या सन २०२५ च्या स्वच्छता पंधरवडयाच्या दिनदर्शिकेनुसार, स्वच्छता पंधरवडा दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे.
३ विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या सक्रिय सहभागाने शाळांमध्ये स्वच्छता अभियान व इतर संबंधित उपक्रम राबविण्यात यावेत, यासाठी शाळा/संस्थांनी दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत खालीलप्रमाणे नमूद उपक्रम राबविणे.
1. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेबाबत शपथ घेणे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक / कर्मचारी यांना सहभागी करून घेणे.
IV.शिक्षकांनी शाळा/संस्थेतील पाणी व स्वच्छता सुविधांची पाहणी करणे, पाणी, स्वच्छता व स्वच्छता सुविधांचे त्वरित मूल्यमापन करणे तसेच गरज भासल्यास सुविधांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी प्रस्ताव/आराखडा तयार करणे.
पालक-शिक्षक बैठकांमध्ये (PTMs) स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व, हात धुण्याचे महत्त्व, जलसंधारण/रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात SMCS/SMDCS/PTAS किंवा पालक आणि शिक्षकांसोबत बैठकी घेणे आणि शाळेत तसेच घरात स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धती सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.
सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व स्वच्छतागृहांच्या स्पर्धा आयोजित करणे.
V. निबंध/घोषवाक्य/कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग शाळेतील स्वच्छता व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
स्वच्छता जनजागृती संदेश संस्था/शाळा/जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दर्शविणे. शाळांमध्ये स्वच्छतेची छायाचित्रे लावणे.
४ शाळांमध्ये शाळा प्रशासनाकडून व शिक्षकांनी खालील नमूद उपक्रम राबविणे.
स्वच्छतेच्या अनुषंगाने टाकाऊ साहीत्यांची विल्हेवाट लावणे, वापरलेले मास्कची विल्हेवाट लावणे, तुटलेले फर्निचर, वापरात नसलेली उपकरणे, नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य शाळा/संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून योग्य प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावणे.
शाळेच्या आवारामध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणे.
शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पंधरवडयाची संकल्पना कुटुंबातील सदस्यांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये त्याचा प्रसार व प्रचार करणे.
3R (Reduce, Reuse and Recycling of waste) तत्त्वांचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबविणे आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती करणे.
वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दैनंदिन साफसफाई व निर्जंतुकीकरण करणे.
स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी जिल्हा, तालुका, केंद्र व शाळा स्तरावर खालील उपक्रम हाती घेण्यात यावे. ५
1. स्वच्छता व जलसंधारणाविषयी विद्यार्थी / कर्मचारी व इतरांना प्रेरित करण्यासाठी दृकश्राव्य कार्यक्रम/जनजागृती साहित्य तयार करणे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
II.स्वच्छता पंधरवडा प्रसिद्धी करण्यासाठी विभागीय/जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे.
६ सन २०२५ चा स्वच्छता पंधरवडा (दि.१६ ते ३० सप्टेंबर २०२५) साठी सुचविलेला कृती आराखडा हा परिशिष्ट ‘अ’ मध्ये दिलेला आहे. त्यानुसार दि.१६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवड्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक व प्रतिनिधी इत्यादींचा सहभाग घेण्यात यावा व स्वच्छता पंधरवडा यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा/शैक्षणिक संस्थांना आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करणे.
७उपरोक्त स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची यशस्विता बघण्यासाठी आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या जिल्हा/महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये उपक्रनिहाय स्वच्छता पंधरवडयात सहभागी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या या कार्यालयास कळविणे, स्वच्छता
पंधरवडयातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे, व्हिडिओ, चित्रपट इत्यादी गुगल ट्रॅकर (डेटा) आणि गुगल ड्राइव्ह (फोटो, व्हिडिओ आणि चित्रे) वर दररोज अपलोड करणे.
गुगल ट्रॅकर आणि ड्राइव्हचा तपशील सोबत दिला आहे.
स्वच्छता पंधरवडा गुगल ट्रकर लिंक-
स्वच्छता पंधरवडा गुगल ड्राइव्ह लिंक आपणांस ई-मेलवर व What’s up वर कळविण्यात येईल.
९ गुगल ट्रॅकर दिनांक १४ सप्टेंबर, २०२५ ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत राबविण्यात आलेले विविध उपक्रमांसाठी दररोज रात्री ७.०० वाजेपर्यंत अद्ययावत केले जावे जेणेकरून जिल्हा महानगरपालिका शाळांची माहिती केंद्रशासनास एकत्रितपणे जलशक्ती मंत्रालयाला (पेयजल आणि स्वच्छता विभागास) कळविणे सुलभ होईल.
जिल्हा/महानगरपालिकांच्या शाळांनी स्वच्छता पंधरवड्यामध्ये त्यांच्या सहभागाबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
११ स्वच्छता पंधरवडा कालावधीमध्ये शाळांनी राबविण्यात आलेले स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित उपक्रम वर्षभर नियमित दिनचर्येशी जोडून सातत्यपूर्णपणे शाश्वत तत्त्वांनुसार सुरू ठेवण्यास प्रोत्साहित करण्यात यावे.
उपरोक्त स्वच्छता पंधरवडयाच्या दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे राबवावयाचे उपक्रम परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.










