शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ shalartha pranali e-kyc 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ shalartha pranali e-kyc 

संदर्भ- १. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २७/३/२०२६

२. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २३/४/२०२६

३. मा प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि. २८/७/२०२६ रोजी आढावा बैठकीत दिलेले निर्देश

४. संचालनालयाचे पत्र.क्र. क्र. शिसंमा/२०२६/टि-६ बि/ई-केवायसी, दि.३१.०७.२०२६.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये माहे ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

तथापि क्षेत्रियस्तरावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेताला असता, सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि. २० सप्टेंबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात

Related posts:

Leave a Comment