प्रसिध्दीपत्रक नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) भरण्याची सुविधा sir fill enumeration form circular
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व विधान सभा मतदार संघाच्या प्ररुप मतदार याद्या दि. 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
मतदार पत्त्यावर रहात नसल्यामुळे किंवा गणना प्रपत्र भरुन न दिल्यामुळे प्रारुप मतदार यादीत समावेश न झालेल्या मतदारांच्या नावांच्या याद्या (अनुपस्थित / स्थलांतरीत / मृत/ दुबार / इतर) मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच मतदान केंद्रावर सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
अशा मतदारांना पात्र असतील तर त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध व्हावी याकरीता भारत निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करुन दिले असून, सदर गणना प्रपत्र भरुन मतदाराला आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येणार आहे (सोबत गणना प्रपत्राची प्रत माहितीसाठी उपलब्ध).
गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्याकरीता दि.30.11.2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
ज्या अनुपस्थित व स्थलांतरीत मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नाहीत अशा मतदारांशी संपर्क साधून मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) गणना प्रपत्र (EF) भरुन घेणार आहेत.
मतदारांना गणना प्रपत्र (EF) भरण्याची सुविधा ECINET वर E-sign सह ऑनलाईन पध्दतीने सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) भरण्याच्या अनुषंगाने मतदारांसाठी सूचना :-
ज्या मतदारांची नांवे प्रारुप मतदार यादीमध्ये अंतर्भूत झालेली नाहीत अशा मतदारांनी आपल्या यादी भागाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी (BLO) संपर्क साधावा.
आपल्या BLO शी संपर्क साधण्यासाठी ECI संकेत स्थळावर / ECINET App वर उपलब्ध असलेल्या “Book a call with BLO” या सुविधेचा वापर करता येईल.
ASDD प्रवर्गातील ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदलले नसेल त्यांनी गणना प्रपत्रातील “परिशिष्ट-ब” सह तसेच ASDD प्रवर्गातील ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदलले असेल त्यांनी तो ज्या मतदार संघात स्थलांतरीत झालेला आहे तेथे गणना प्रपत्रातील “परिशिष्ट-क” सह, आपले गणना प्रपत्र स्वाक्षरी करुन सादर करावे:-
(१) ऑनलाईन पध्दतीने,
(२) संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) / सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) / मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे स्वतः किंवा कुटुंबियांमार्फत.
(३) दिनांक 28 व २९ नोव्हेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबीरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना स्वतः किंवा कुटुंबियांमार्फत.











