प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत teacher’s eligibility test exam

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत teacher’s eligibility test exam

वाचा – १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: पीटीआर-१११३/

(१/२०१३)/एसएम-४, दिनांक १३.१२.२०१३

प्रस्तावना :-

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी राज्यात दि.१ एप्रिल २०१० पासून सुरु करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दि.३१ मार्च, २०१० च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्यासाठी कलम २३ नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एन.सी.टी.ई.) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दि.२३ ऑगस्ट, २०१० व दि.२९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता १ ली ते ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य केली आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय दि.१३ फेब्रुवारी, २०१३ अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता १ली ते ८वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य केली आहे.

सदर शासन निर्णयान्वये शिक्षक पात्रता परीक्षाबाबत निर्देश देऊनही राज्यात नियुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसल्याचे दिसून आले आहे. तसेच सदर शासन निर्णयापूर्वी कार्यरत शिक्षकांनीही शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित करुनही त्याची अंमलबजावणीबाबत साशंकता आढळून येते. यास्तव प्रस्तुत शासन परिपत्रकान्वये शासन पुढीलप्रमाणे निर्देशित करीत आहे :

शासन परिपत्रक :-

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी (इयत्ता १ ली ते ८ वी) शासन निर्णय दि. १३ फेब्रुवारी, २०१३ अन्वये केंद्र शासनाने निदेशित केल्यानुसार किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे. तसेच शासन निर्णय दि.१३.१२.२०१३ ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रथम ३ संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. सदर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ३ संधीत उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी (इयत्ता १ ली ते ८ वी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण

उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. याप्रकारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरुपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे, अशाप्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्रसमाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरुपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. परंतू शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१६०६३०१६२७४८०९२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

 

Related posts:

Leave a Comment