सन २०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत udise plus adhar validation 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ यु-डायस प्लस प्रणालीमधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत udise plus adhar validation 

संदर्भ: १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/२०२३-DIGED-Part (२) दि. १० एप्रिल, २०२६.

२) शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे क्र. आशिका/२०२६/६.आं/आस्था-क१४४ दि. २३ जुलै, २०२६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस प्रणालीमधून आधार व्हॅलिडेशन व अपार आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही दि. ३० जून, २०२६ पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संदर्भिय क्र. २ नुसार शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. ०१ जुलै, २०२६ रोजी आढावा घेण्यात आला. यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनमध्ये मुंबई, पालघर, धुळे, ठाणे, नंदुरबार या जिल्ह्याच्या आधार Validation मध्ये मागे असल्याबाबत दिसून आले आहे आणि अपार आयडी तयार करण्यामध्ये धुळे, मुंबई, नागपूर, नांदेड, लातूर सर्वात मागे असल्याबाबत दिसून आले आहे. याबाबत जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात येते की, दि. १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत आधार उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.

आधार व अपार आयडी काढतांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याकरिता जिल्हा व

तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे व झालेल्या प्रगतीचा आढावा

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावा. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शाळेमधील यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले असल्याची खात्री करण्यासाठी सूचित करावे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे त्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमधून नोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे.

तसेच मुख्यध्यापकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Coordinator व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना आपल्या स्तरावर आदेशित करावे. जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील अपार नोंदणीबाबत सर्व अडचणी एकत्रिक करून या कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे, या कार्यालयाकडून आवश्यकते तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल.

सोबत : संदर्भिय पत्र व जिल्हानिहाय अहवाल.

Related posts:

Leave a Comment