राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचनांची अंमलबजावणी करणेबाबत vidhyarthi suraksha upayayojana shasan nirnay 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचनांची अंमलबजावणी करणेबाबत vidhyarthi suraksha upayayojana shasan nirnay 

संदर्भ :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५१/२५, एसएम १, दिनांक-१६/०४/२०२५

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ११९/ एसडी ४. दिनांक-१३/०५/२०२५

३) संचालनालयाकडील पत्र जा.क्र. क्र. प्राशिसं/ ८०२/संकीर्ण/२०२५, दि. २१/०५/२०२५

संदर्भीय शासन निर्णयाचे व पत्राचे अवलोकन करावे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय/परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना व दिनांक २६/०९/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने शासन निर्णय दिनांक-१३/०५/२०२५ अन्वये तसेच संचालनालयाच्या दिनांक २१/०५/२०२५ च्या पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात खालील विषयाबाबत अंमलबजावणी करणेबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

१. “लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२” मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे.

२. शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार POCSO e-Box व CHIRAG या अॅपवर करणे व इतर उपाययोजना करणे.

३. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत.

४. शाळांमध्ये सखी सावित्रीचे गठन करण्याबाबतची कार्यवाही करणे.

५. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.

६. कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.

७. विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.

८. शाळेतील स्वच्छतागृह/प्रसाधन गृहांबाबत कार्यवाही करणे.

९. शाळेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी आचारसंहिता लागू करणे.

१०. सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा/पालकांनी करावयाची कार्यवाही.

११. क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण या संदर्भात करावयाची कार्यवाही.

१२. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन.

१३. जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठन व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण.

१४. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार/अनिष्ट घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन / संस्था / मुख्याध्यापक / शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित/अनिष्ट घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित व्यक्ती / संस्था गंभीर शिस्तीस / कारवाईस पात्र ठरतील.

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती जिल्हानिहाय एकत्रित करून दिनांक २७/०६/२०२५ व दिनांक २८/०६/२०२५ रोजी होणाऱ्या बैठकीस या माहितीसह उपस्थित राहावे.

सहपत्र – वरीलप्रमाणे

Related posts:

Leave a Comment