छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti 

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता !

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता!

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या

मित्र – मैत्रिणीनों….

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राज आहे.

आज १९ फेब्रुवारी आहे.आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.

सर्वप्रथम, सर्वांना शिवजयंतीच्या खूप – खूप शुभेच्छा !

छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी व पराक्रमी राजा होते. १९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला, ते सिंह म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय.

छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार आणि पिता शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजविले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तानाजी मालुसरे, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान सारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या राज्यात गरीब-श्रीमंत, जात-धर्म यामध्ये भेद नव्हता. स्त्रियांचा सन्मान, माणुसकी आणि प्रजेवर अपार प्रेम होते. न्याय, समानता आणि स्वाभिमान ही त्यांच्या राज्यकारभाची ओळख होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचा अभिमान व शान आहेत. त्यांना माझे कोटी – कोटी प्रणाम !

शब्दही अपुरे पडती, अशी शिवबांची किर्ती।

राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचे शिवछत्रपती !

जय जिजाऊ ! जय शिवाजी !

Related posts:

Leave a Comment