जिल्हा स्तरावरील ‘आयडॉल शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग व त्यांचा प्रशिक्षण कार्यशाळांमधील सहभागाबाबत idol teacher training workshop
संदर्भ- १. आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करणे बाबत शासन निर्णय १६ एप्रिल २०२५
२. या कार्यालयाचे पत्र E:१९८०५०७/अविचि/आयडॉल/२०२५ दि.२८/११/२०२५
३. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे कडील दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभेतील निर्देश
संदर्भ क्र. १ अन्वये, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची बैंक तयार करण्यासाठी राज्यामध्ये आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून सर्व तालुकास्तरीय याद्यांची पडताळणी करून राज्यस्तरासाठी जिल्ह्यातील १० सर्वोत्तम शिक्षकांची यादी गुणांकनासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठविण्याच्या सूचना केलेल्या होत्या, त्याप्रमाणे कार्यवाही करून राज्य स्तरावर ३३२ नामांकने प्राप्त झाली. त्यांची यादी सोबत जोडली आहे.
संदर्भ क्र.३ नुसार राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करून देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर निवड झालेल्या idol शिक्षकांच्या बाबतीत आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करणे बाबत शासन निर्णय १६ एप्रिल २०२५ अन्वये खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये या आयडॉल शिक्षकांचा प्रामुख्याने सहभाग घेण्यात यावा. त्यांना आवश्यकतेनुसार ‘तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात यावे.
आयडॉल शिक्षक यांच्या कामाचे चित्रीकरण, दस्त/अभिलेख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे (उदा. ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट तयार करणे व संकेतस्थळावर प्रकाशित करणे). तसेच हे सर्व अभिलेख राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात यावे.
शिक्षण परिषदांमध्ये आयडॉल शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण / विशेष कार्याचा प्रचार-प्रसार करावा तसेच आयडॉल शिक्षकांचे उद्बोधन ठेवावे.
संबंधित आयडॉल शिक्षकांचा विविध समितीच्या बैठकामध्ये सन्मान करणे व त्यांच्या कार्याचा लेखा-जोखा ठेवावा तसेच तालुका / जिल्हा / विभाग स्तरावरील विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यांमध्ये त्यांच्या कामाचा उपयोग करणेबाबत चर्चा करावी.
सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षकांच्या शाळांना इतर शाळांमधील शिक्षकांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच अधिकारी यांच्या भेटींचे नियोजन करावे तसेच इतरांना प्रोत्साहित करावे.
जिल्ह्यातील सर्व आयडॉल शिक्षकांबाबत वरील सूचनांनुसार कार्यवाही करून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा शैक्षणिक कार्यात उपयोग करून घ्यावा.
सोबत – राज्य स्तरावर प्राप्त ३३२ नामांकने यादी









