सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेत्तर समायोजनाबाबत shikshak samayojan paripatrak
संदर्भ : १. शासन निर्णय क्र. एयएयएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२ दि.१५.०३.२०२४
२. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/२०२५-२६/समायोजन/टि-८ व/१७०४०८८ दि.०४.०२.२०२६
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदींनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करणेबाबत संचालनालयाचे संदर्भक्र. अन्वये कार्यवाही करणेबाबत आपणांस अवगत करण्यात आले होते.
१. शुन्य शिक्षक/शिक्षकेत्तर पदे मंजूर असणा-या शाळेमधील शिक्षक-शिक्षकेत्तर अतिरिक्त कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरु असून सदर शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल २०२६ मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परिक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झालेनंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचे.
२. कार्यरत शिक्षकेत्तर वर्ग-४ चे कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग-४ चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल. (शासन निर्णय दि.२७.०१.२०२६ मधील क मधील (२) ज्या पदांवर नियमित चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत, अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये अशी तरतुद आहे).
सबब आपणांस कळविण्यात येते की, ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजन झालेबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचा-यांची माहिती संबंधित शिक्षण उपसंचालक यांचेकडे व संचालनालयास दि.०६.०४.२०२६ पर्यंत कळविण्यात यावी तसेच ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन विभाग स्तरावर करावयाचे असल्यास त्यासंबंधीतील माहिती संचालनालयास दि.०६.०४.२०२६ अन्वये सादर करावी.











