जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणाबाबत भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना census guidelines
संदर्भः भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालय (ORG&CCI) यांचे पत्र क्र.F. No.21099/PrgTrg/2026/07(C.No. 56186), दि. 13.03.2026 (प्रति संलग्न)
महोदय / महोदया,
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त (ORG&CCI) यांच्या कार्यालयामार्फत प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणासंबंधी सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त (ORG&CCI) यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 30 जानेवारी, 2026 रोजी जारी करण्यात आलेले जनगणना-2027 परिपत्रक क्र. 9 (प्रति संलग्न) हे जनगणना क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासंबंधी आहे. जनगणना-2027 साठी प्रशिक्षण कॅस्केड पद्धतीने आयोजित करण्यात येत असून, राज्याच्या क्षेत्रीय कार्याच्या अधिसूचित वेळापत्रकानुसार सध्या फील्ड ट्रेनर्स (FTs) यांचे 3 दिवसीय प्रशिक्षण सर्व प्रधान जनगणना कार्यालय स्तरावर सुरु आहे. तदनंतर, प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण हा
अंतिम पण महत्वपूर्ण टप्पा नियोजित असून ज्यामध्ये दि. 23 एप्रिल, 2026 ते दि 8 मे, 2026 दरम्यान ४ ते ५ प्रशिक्षण बॅचेस आयोजित करावयाच्या आहेत.
2. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त (ORG&CCI) यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त उपरोक्त मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रधान जनगणना अधिकारी, चार्ज जनगणना अधिकारी, फील्ड ट्रेनर्स, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या इत्यादींचा समावेश आहे. प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण सत्राची नमुना रूपरेखा संलग्नित परिशिष्ट- येथे दिली आहे.
3. प्रशिक्षित फिल्ड ट्रेनर्ससाठी स्वतंत्र मार्गदर्शक नोट (परिशिष्ट-11) तयार करण्यात आलेली आहे जी त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणात वापरावी. प्रधान जनगणना अधिकारी यांनी फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ही मार्गदर्शन नोट, सूचना पुस्तिका आणि इतर साहित्यांसह वितरण सुनिश्चित करावे. जर फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण पूर्ण झाले असेल, तर त्यांच्यापर्यंत ही मार्गदर्शन नोट पोहोचविण्याची व्यवस्था करावी व त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी ती वाचलेली असेल हेही सुनिश्चित करावे. प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनासाठी महत्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेतः
8) जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली (CMMS) मध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची नोंदणीः
चार्ज स्तरावर CMMS वेब पोर्टल मध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, वय, लिंग, मोबाइल क्रमांक, पदनाम, ओळखपत्र प्रकार व क्रमांक, कार्यालयाचे नाव व पत्ता इ. नोंदविणे हे त्यांचे प्रशिक्षण बेंच तयार करण्यासाठी आवश्यक आहे आणि सदर कार्यवाही अग्रक्रमाने पूर्ण करावी अन्यथा प्रशिक्षणात विलंब होऊ शकतो. प्रगणक व पर्यवेक्षक यांचा ई-मेल आयडी वैकल्पिक असून तो उपलब्ध असल्यास तोही नोंदवावा.
CMMS चे दोन पोर्टल उपलब्ध आहेतः
प्रशिक्षण व सरावासाठी: https://test.census.gov.in
प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यासाठी: https://census.gov.in
दोन्ही वेब पोर्टलवर प्रगणक व पर्यवेक्षक यांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी Bulk Upload ही सुविधा वापरता येईल.
b) प्रशिक्षण बॅचेस तयार करणे आणि फिल्ड ट्रेनर्सची नेमणूकः
i. चार्ज जनगणना अधिकारी CMMS (https://census.gov.in) वेब पोर्टलवर उपलब्ध माहितीवरून प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण बॅचेस तयार करतील. एका बॅचमध्ये
साधारणतः 40 ते 45 प्रशिक्षणार्थी असावेत आणि 50 पेक्षा जास्त नसावेत. आवशक्यता नसल्यास कमी आकाराच्या बॅचेस तयार करणे टाळावे.
ii. प्रत्येक बॅचचे प्रशिक्षण दोन 2 फिल्ड ट्रेनर्सची 1 टीम यांच्यामार्फत घेतले जाईल. फिलेड ट्रेनर्सच्या अश्या प्रत्येक टीम ने प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाचे चार बॅचेस घ्यावेत. तथापि, क्वचित प्रसंगी अधिक बॅचेस घेण्याची आवश्यकता असल्यास, त्यापेक्षा अधिक बॅचेस घेण्याची जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते.
iii. ज्या चार्जमध्ये प्रशिक्षण स्थळे एकापेक्षा जास्त ठिकाणी विखुरलेली असतील, तिथे शक्यतो त्या प्रशिक्षण स्थळाजवळ राहणाऱ्या फिल्ड ट्रेनर्स ची नेमणूक करावी.
iv. काही प्रसंगी एकापेक्षा जास्त चार्जमधील प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक होऊ शकते. अशा वेळी प्रधान जनगणना अधिकारी, जिल्हा/महानगरपालिका प्रशासक म्हणून CMMS मध्ये सर्व संबंधित चार्जमधील प्रगणक आणि पर्यवेक्षकांची यांच्या संयुक्तिक बॅचेस तयार करतील.
v. प्रशिक्षण बॅचेस तयार झाल्यावर, CMMS प्रणालीद्वारे प्रगणक, पर्यवेक्षक आणि फिल्ड ट्रेनर्स यांना प्रशिक्षणाच्या तारखा, स्थळ इत्यादी तपशीलांसह SMS मिळतील चार्ज जनगणना अधिकारी यांनी सर्व फिल्ड ट्रेनर्स आणि प्रगणक-पर्यवेक्षकांना प्रशिक्षणाच्या तारखा, वेळ आणि स्थळाबाबत वैयक्तिकरीत्या आधीच सूचना द्याव्यात आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याबाबत निदेर्शित करावे.
vi. चार्ज जनगणना अधिकारी यांनी हे सुनिश्चित करावे की फिल्ड ट्रेनर्स आणि प्रगणक-पर्यवेक्षकांना त्यांच्या कार्यालये/शाळा/संस्था यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी/प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कार्यमुक्त केले जाईल.
vii. चार्ज जनगणना अधिकारी यांनी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी फिल्ड ट्रेनर्स यांची बैठक बोलावून केलेल्या व्यवस्थांबाबत सूचना, प्रशिक्षणमधील त्यांची जबाबदारी आणि उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत सूचना द्याव्यात.
viii. फिल्ड ट्रेनर्सच्या टीम्स प्रशिक्षणाच्या अनेक बॅचेस हाताळणार आहेत, प्रशिक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. एका फील्ड ट्रेनरनी सकाळचे सत्र घ्यावे, तर दुसऱ्या फिल्ड ट्रेनरने दुपारचे सत्र हाताळावे. प्रत्येक सत्रात दोन्ही ट्रेनर्सची उपस्थिती अनिवार्य नाही. तथापि, प्रत्येक ट्रेनरने दुसऱ्या ट्रेनरनी घेतलेल्या सत्रांची पूर्ण माहिती ठेवणे आवश्यक आहे, ज्यात आधी शिकवलेली सामग्री आणि शिल्लक भाग
यांचा समावेश आहे, जेणेकरून प्रशिक्षणात सातत्य आणि एकसंधता राहील. उद्घाटन सत्र, समारोप सत्र आणि सराव सत्रांमध्ये दोन्ही ट्रेनर्स ची उपस्थिटी अनिवार्य आहे.
ix. चार्ज जनगणना अधिकारी यांनी हे सुनिश्चित करावे की प्रत्येक फिल्ड ट्रेनरला अंतिम प्रशिक्षण सत्राचे वेळापत्रक, मार्गदर्शक नोट, सूचना पुस्तिका, किट सामुग्री आणि प्रगणक-पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वापरायची इतर शैक्षणिक सहाय्य सामग्री मिळालेली आहे.
c) प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रशिक्षणाचे वेळापत्रकः
1. प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी 3 दिवसाचा आहे. 2 फिल्ड ट्रेनर्सची प्रत्येक टीम 4 प्रशिक्षण बॅचेस घेईल, ज्यामध्ये बॅचेसदरम्यान एक दिवसाचा अंतर ठेवले जाईल. सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण क्षेत्रीय कार्य सुरु होण्यापूर्वी किमान एक आठवडा आधी पूर्ण झाले पाहिजे.
ii. चार्ज जनगणना अधिकाऱ्यांनी हेही सुनिश्चित केले पाहिजे की प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण क्षेत्रीय कार्य सुरू होण्यापूर्वी फार लवकर पूर्ण होऊ नये. प्रशिक्षणाचा समारोप व घरयादी व घर गणनेच्या क्षेत्रीय कार्याचा प्रारंभ यामधील अंतर फार मोठे नसावे, जेणेकरून क्षेत्रीय कार्य सुरु करताना प्रशिक्षणातिल विषय प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या योग्यरित्या लक्षात असतील.
iii. काही प्रसंगी स्थानिक परिस्थितीमुळे जसे की स्थानिक सुट्ट्या, चार्ज सीमांमधील बदल, किंवा प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या संख्येत मोठी वाढ इ. प्रशिक्षण वेळापत्रकात बदल करणे आवश्यक होऊ शकते. अशा बदलांची माहिती चार्ज जनगणना अधिकाऱ्यांनी संबंधित प्रधान जनगणना अधिकारी व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी कार्यालयास द्यावी.
d) प्रशिक्षणासाठी स्थळांची निवड आणि व्यवस्थाः
1. प्रत्येक चार्जमध्ये कमी कालावधीत मोठ्या संख्येने प्रशिक्षण बॅचेस आयोजित करावे लागणार असल्यामुळे प्रशिक्षण स्थळ निवड हा प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाचा विशेषतः महत्त्वाचा भाग आहे. बहुतेक प्रशिक्षण चार्ज मुख्यालयात घेतले जाईल. तथापि, मोठे भौगोलिक विस्तार/क्षेत्र असलेल्या चार्जमध्ये काही प्रशिक्षण स्थळे चार्ज मुख्यालयाच्या व्यतिरिक्त इतर योग्य ठिकाणी विकेंद्रीत करणे आवश्यक होऊ शकते. प्रशिक्षण स्थळ निवडीचे निकष भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त (ORG&CCI) यांच्या कार्यालयाच्या दि. 30.01.2026 रोजीच्या परिपत्रक क्र. 9 च्या परिच्छेद 17 मध्ये विनिर्दिष्टित आहेत ज्याबद्दल सर्व चार्ज जनगणना अधिकाऱ्यांना सूचित करावे.
ii. एक सुसज्ज स्थळ प्रशिक्षणाच्या योग्य संचालनास मोठी मदत करेल. चार्ज जनगणना अधिकाऱ्यांनी योग्य स्थळ निवडले गेले आहे याची खात्री करावी आणि प्रशिक्षण बॅचेस तयार करताना त्यांचे आवश्यक तपशील CMMS वेब पोर्टलवर नोंदवावेत.
iii. मंजूर प्रशिक्षण भत्यातून प्रशिक्षणार्थीसाठी चांगल्या दर्जाचे भोजन, अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी याची व्यवस्था असावी. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्या आणि शौचालयांची दररोज स्वच्छतेची व्यवस्था केली जावी.
iv. चार्ज जनगणना अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण स्थळांची व्यवस्था वेळेआधीच अंतिम करावीत व त्याबाबतीत या संचानालयास अवगत करावे.
e) प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रशिक्षणामध्ये चार्ज/अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकाऱ्यांची उपस्थितीः
1. चार्ज जनगणना अधिकारी (किंवा अतिरिक्त जनगणना चार्ज अधिकारी) यांनी प्रत्येक बॅचच्या पहिल्या दिवशी पूर्वाह्न सत्रात उपस्थित राहावे. त्यांनी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सर्व दिवस प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य असल्याबाबत वैयक्तिकरीत्या सूचना दयाव्यात आणि योग्य चौकशीसह जनगणना कार्य प्रामाणिकपणे करण्याचे महत्त्व अधोरेखित करावे, जेणेकरून माहिती योग्य, अचूक आणि ठरवलेल्या कालावधीत गोळा केली जाईल. तसेच, पुढील प्रशिक्षण बेंच सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीकडून अभिप्राय घेण्यासाठी आणि कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेवटच्या दिवशीही उपस्थित राहावे.
ii. याशिवाय, त्यांनी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांना स्वतंत्रपणे सेवा भाव प्रतिज्ञा घ्यायला लावावी, ज्याद्वारे प्रत्येक घरगुती कुटुंबाकडून माहिती गोळा करताना शिष्टाचार, तटस्थता आणि समर्पणाने सेवा करण्याची त्यांची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली जाईल. प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी नमुना सेवा भाव प्रतिज्ञा अनुक्रमे परिशिष्ट-।।। (अ) आणि परिशिष्ट-।।। (ब) मध्ये संलग्नित आहेत. प्रतिज्ञा घेण्याच्या वेळी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रतिज्ञेच्या प्रती वाचण्यासाठी वितरित केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर त्यांनी संबंधित प्रतिज्ञांवर सही करावी. क्षेत्रीय कार्यादरम्यान आपल्या कर्तव्यांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी त्या प्रतिज्ञा त्यांनी स्वतःकडे स्मरणपत्र म्हणून ठेवाव्यात
f) फिल्ड ट्रेनर्सद्वारे प्रगणक व पर्यवेक्षक यांची उपस्थिती नोंदवणेः
1. 2 फिल्ड ट्रेनर्सच्या एका टीमला, जनगणना चार्ज अधिकाऱ्यांद्वारे नेमलेल्या बॅचेसची दैनिक उपस्थिती पत्रके, जी सीएमएमएस (CMMS) मधून तयार केलेली, त्याच्या छापील प्रती उपलब्ध करून दिल्या जातील. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांनी दररोज
उपस्थिती पत्रकावर सही करावी. प्रत्येक दिवसाच्या उपस्थितीवर संबंधित दोन्ही फिल्ड ट्रेनर्सनी प्रतिस्वाक्षरी करणे आवश्यक आहे. जर कोणताही प्रगणक व पर्यवेक्षक अनुपस्थित असतील, तर फिल्ड ट्रेनर्सद्वारे त्यांची अनुपस्थिती स्पष्टपणे दर्शवण्यासाठी त्यांच्या नावापुढे ‘X’ या प्रकारे खूण करावी. प्रशिक्षणाच्या शेवटी, 2 फिल्ड ट्रेनर्सच्या 1 टीमने प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकने उपस्थित राहिलेल्या एकूण दिवसांची संख्या दर्शवणारे सारांश पत्रक भरावे आणि रीतसर स्वाक्षरी केलेली व प्रतिस्वाक्षरी केलेली उपस्थिती पत्रके जनगणना चार्ज अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावीत. जनगणना चार्ज अधिकारी सीएमएमएस (CMMS) पोर्टलवर प्रगणक व पर्यवेक्षक यांची उपस्थिती अद्ययावत करतील. सीएमएमएस (CMMS) मध्ये उपस्थिती अद्ययावत केल्यानंतर, रीतसर स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकांच्या छापील प्रती नोंदीसाठी आणि पुढील आवश्यक संदर्भासाठी संबंधित प्रभारी कार्यालयात ठेवल्या जातील.
ii. संयुक्त प्रशिक्षण तुकड्यांसाठी, CMMS मधील उपस्थिती प्रधान जनगणना अधिकारी कार्यालयाद्वारे अद्ययावत केली जाईल आणि मूळ उपस्थिती पत्रके प्रधान जनगणना अधिकारी कार्यालयाकडे ठेवणे आवश्यक आहे आणि उपस्थिती पत्रकांच्या प्रती ज्या जनगणना चार्ज कार्यालयांमधून प्रगणक व पर्यवेक्षकयांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे.
g) CMMS मध्ये पर्यवेक्षक म्हणून नोंदणीकृत फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षणः
जर एखादा फिल्ड ट्रेनर CMMS मध्ये पर्यवेक्षक म्हणून नोंदणीकृत असेल, तर त्याला/तिला प्रशिक्षणात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही आणि तो/ती पर्यवेक्षक म्हणून कोणत्याही प्रशिक्षण भत्यासाठी पात्र असणार नाही. अशा ट्रेनर्सना कोणत्याही प्रशिक्षण तुकडीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नामनिर्देशित करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांनी आवश्यक प्रशिक्षण आधीच पूर्ण केलेले आहे.
h) प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी सूचना पुस्तिका आणि अध्ययन साधनेः
i. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या वापरासाठी असलेल्या, घर यादी व घरगणना (HLO) संबंधित सूचना पुस्तिका, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाकडून (ORGI) संबंधित जनगणना चार्ज कार्यालयांना पाठवल्या जात आहेत आणि त्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला प्रगणक व पर्यवेक्षकांना वितरित केल्या जातील. तसेच, प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी एक तपासणी सूची (चेकलिस्ट) परिशिष्ट-IV मध्ये दिलेली आहे. ही तपासणी सूची प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रगणक व पर्यवेक्षकांना देण्यात यावी.
ii. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाशी संबंधित इंग्रजी तसेच मराठी भाषेतील पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स (PPTs) या संचानालयाकडून लवकरच वितरित केले जातील. भाषांतरित पॉवरपॉइंट
प्रेझेंटेशन्स (PPTs) सर्व जनगणना चार्ज अधिकाऱ्यांना वितरित करण्यात यावेत व सर्व फील्ड ट्रेनर्सना प्रगणक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण सत्रांदरम्यान वापरण्यासाठी ते पुरवल्या जातील हे सुनिश्चित करावे. याव्यतिरिक्त, सदर भाषांतरित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स (PPTs), जनगणना चार्ज अधिकाऱ्याच्या सुलभ संदर्भासाठी सीएमएमएस (CMMS) वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील.
iii. अतिरिक्त प्रशिक्षण साधनांच्या छापील प्रती, जसे की सुलभ संदर्भ पत्रक, जसे की अॅप फ्लो, काय करावे आणि काय करू नये, त्रुटी हाताळणी, रेडी रेकनर इत्यादी, उपलब्धतेनुसार, प्रगणक व पर्यवेक्षकांना A4 आकाराच्या कागदावर इंग्रजीमध्ये किंवा मराठी भाषांमध्ये पुरविण्यात याव्यात. घर यादी व घर गणना क्षेत्रीय कार्याचे वेळापत्रक आणि मोबाईल अॅप स्क्रीनच्या रंगीत प्रिंटआउट्स प्रशिक्षण हॉलमध्ये A0/A1 आकारात ठळकपणे प्रदर्शित करण्यात याव्यात.
iv. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाकडून प्रगणक व पर्यवेक्षकांकरीता शॉर्ट माहितीपट लवकरच शेअर केले जातील. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या सहज उपलब्धतेसाठी संबंधित व्हिडिओंच्या लिंक्स, किंवा व्हिडिओ लिंक्स आणि क्यूआर कोड असलेली भाषानिहाय पत्रके पुरविण्यात यावीत.
1) जनगणना चार्ज स्तरावर प्रशिक्षणाचे निरीक्षणः
1. राज्यातील सर्व जनगणना चार्ज मध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी संचानालयाद्वारे नियुक्त जिल्हा समन्वयक दौरा करतील ज्यामध्ये प्रशिक्षण आयोजनाचा आढावा घेण्यात येईल. तसेच प्रशिक्षणादरम्यानही, दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचे आणि सहभागाचे मूल्यांकन करण्यासाठीही जिल्हा समन्वयक भेट देतील. सर्व जनगणना चार्ज अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्हा समन्वयकांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे.
शासन परिपत्रक pdf download
ii. प्रशिक्षणाच्या प्रगतीवर CMMS वेब पोर्टलच्या प्रशिक्षण डॅशबोर्डद्वारेही देखरेख ठेवली जाईल. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालय, जनगणना संचानालय, महाराष्ट्र, महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रशिक्षणाच्या गुणवतेचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांना भेटी देण्यात येतील. जर गुणवतेचे निकष पूर्ण होत नसतील, तर त्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे अधिकार त्यांना असतील, ज्यामध्ये सत्राचे पुनर्निर्देशन करणे किंवा प्रशिक्षकांना बदलणे यांचा समावेश असेल 4 प्राप्त प्रशिक्षण सामग्री आणि फील्ड ट्रेनर्स यांच्या प्रशिक्षण कामगिरीबाबत सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याकडून अभिप्राय विहित नमुन्यात (परिशिष्ट-V) संकलित करावेत. चार्ज जनगणना अधिकारी आपल्या चार्जमधील सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्हा जनगणना अधिकारी अथवा प्रधान जनगणना अधिकारी यांना एक सारांश अहवाल सादर करतील. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचा एकत्रित अहवाल प्रधान जनगणना अधिकारी कार्यालयामार्फत या संचानालयास सादर करतील.










