राज्य शासन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत mofat shoe and socks yojana
संदर्भ :
-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसए-१२१४/प्र.क्र.५०/एस.डी-३ दि.०६ जुलै, २०२३.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसए-२०२५/प्र.क्र.७६/एसडी-३/१०६७४२८ दि.२८/०४/२०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयानुषंगाने कळविण्यात येत आहे की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती स्तरावरुन एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्याच्या धोरणात्मक निर्णय शासनाने दि. ०६ जुलै, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. याकरिता प्रति लाभार्थी रक्कम रु.१७०/- तरतूद निश्चित केली आहे.
त्यानुसार संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये राज्य गणवेश योजनेंतर्गत सर्व गणवेशपात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाच्या एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता उपलब्ध करुन दिलेला निधी वितरीत करण्यात येत आहे.
तसेच सदर राज्य गणवेश योजनेंतर्गत दारिद्रय रेषेवरील पालकांची मुले यांना वितरीत करण्यात येणारे दोन गणवेश संच व सर्व गणवेश पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणारे बुट व
पायमोजे यावर होणाऱ्या खर्चाची नोंद PFMS प्रणालीमध्ये करण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे PFMS प्रणालीमध्ये समग्र शिक्षा योजनेंतर्गत RTE Entitlements अंतर्गत पर्यायामध्ये खर्चाची नोंद करण्यात यावी.
State Uniform Scheme
1) General Boys (2 Set Unifom)
2) All Uniform eligible beneficiaries (1 set shoes & 2 set socks)
सन २०२३-२४ च्या यु-डायस मधील उपलब्ध जिल्हानिहाय लाभार्थी संख्येनुसार सन २०२५-२६ मध्ये समग्र शिक्षा राज्य गणवेशाचे एकूण ४२,९७,७९० लाभार्थ्यांना यांना एक जोड बुट व दोन जोडी पायमोजे वितरणाकरिता विनियोगात येणाऱ्या तरतूदीचा जिल्हानिहाय तक्ता पताका “अ” सोबत जोडण्यात येत आहे. प्रस्तावित उद्देशाकरिताच सदरचा निधी चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) विनियोगात आणावा.











![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)