इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ eleventh online addmission
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थ्यांकरीता प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा दिनांक १० एप्रिल २०२६ पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळ, पुणे यांचा इयत्ता १० वी चा निकाल जाहिर होई पर्यंत देण्यात आली होती. दिनांक १०/०४/२०२६ ते ०८/०५/२०२६ पर्यंत एकूण ७,७४,९१८ विद्याथ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन नोंदणी केलेली आहे.
दिनांक ०८/०५/२०२६ रोजी इयत्ता १० वी चा निकाल जाहिर झालेला आहे. दिनांक ११ मे २०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग-१ आणि भाग-२ भरुन इयत्ता ११ वी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा – https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सदर प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी १ चे वेळापत्रक सोबत सादर करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती, सूचना वेळोवेळी प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.








![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)
