सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत sanchmanyata
संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय एसएसएन-२०१५/प्र.क्र.(१६/१५)/टिएनटी-२, दि. १५.०३.२०२४
२) शासन पत्र क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.५५/टिएनटी-२, दि.१८.०३.२०२६
३) समक्रमांकाचे शासन पत्र दि.२४.०३.२०२६
शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील संचमान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.२४.०२.२०२६ रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्र. ७०२, सातवा मजला (विस्तार), मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील गट ९-१० च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये काही निकषांच्या आधारे संदर्भ क्र. ३ च्या पत्रान्वये सवलत देण्यात आली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होवू नये म्हणून सदर सवलतींमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :
१. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार गट ९-१० करिता ग्रामीण भागासाठी वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता करताना दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावेत.
२. सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये.









