TET मराठी काळ आणि काळाचे प्रकार सराव प्रश्नसंच tet practice questions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मराठी काळ आणि काळाचे प्रकार सराव प्रश्नसंच tet practice questions 

पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा.

(1) संदीप क्रिकेट खेळ.

(2) संदीप क्रिकेट खेळेल.

(३) संदीप क्रिकेट खेळतो.

(4) संदीप क्रिकेट खेळला.

उत्तर पर्याय क्रमांक 3

2) राजूने चित्र काढले असेल. या वाक्याचा काळ ओळखा

(1) पूर्ण वर्तमानकाळ

(2) पूर्ण भविष्यकाळ

(3) अपूर्ण भविष्यकाळ

(4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 2

3)’सर्वच कसे पाण्यात बुडतील?’ या वाक्यातील काळ ओळखा

(1) पूर्ण भूतकाळ

(2) रीति भविष्यकाळ

(3) अपूर्ण भूतकाळ

(4) साधा भविष्यकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 4

4) वाक्यातील काळ ओळखा. रविकांत लाडू खात असे.

(1) साधा भूतकाळ

(2) पूर्ण भूतकाळ

(3) रीति भूतकाळ

(4) रीति वर्तमानकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

5) ‘त्याने निबंध लिहिला.’ या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.

(1) तो निबंध लिहीन.

(2) तो निबंध लिहित असेन.

(3) तो निबंध लिहितो.

(4) तो निबंध लिहित जाईन.

उत्तर पर्याय क्रमांक 3

6) ‘मुलगा पुस्तक वाची.’ या वाक्यातला काळ ओळखा.

(1) रीति भविष्यकाळ

(2) रीति भूतकाळ

(3) रीति वर्तमानकाळ

(4) साधा भविष्यकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 2

7) ‘ताईने निबंध लिहीला आहे’ या वाक्यातील काळ ओळखा.

(1) साधा वर्तमानकाळ

(2) रीति भविष्यकाळ

(3) पूर्ण भूतकाळ

(4) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 4

8) ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा.

(1) अपूर्ण वर्तमानकाळ

(2) पूर्ण वर्तमान काळ

(3) रीति वर्तमानकाळ

(4) रीति भूतकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 4

9) तो नेहमीच भांडण करतो. वाक्याचा काळ ओळखा

(1) रीति भूतकाळ.

(2) पूर्ण भूतकाळ

(3) चालू वर्तमानकाळ

(4) रीति वर्तमानकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 4

10) ‘मधू लाडू खात जाईल’ या वाक्यातील काळ ओळखा.

(1) भविष्यकाळ

(2) वर्तमानकाळ

(3) रीति भविष्यकाळ

(4) रीति वर्तमानकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

11) मी वाचत जाईल. या वाक्याचा काळ ओळखा

(1) चालू भविष्यकाळ

(2) रीति भविष्यकाळ

(3) रीति भुतकाळ

(4) पूर्ण भविष्यकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 2

12) मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा

(1) भविष्यकाळ

(2) भूतकाळ

(3) वर्तमान काळ

(4) रीति काळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

13) तो मुलगा खेळत आहे. या वाक्याचा काळ ओळखा ?

(1) अपूर्ण भविष्यकाळ

(2) अपूर्ण भूतकाळ

(3) अपूर्ण वर्तमानकाळ

(4) भूतकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

14) खालील शब्दातील काळ ओळखा. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात.

(1) रीति भुतकाळ

(2) रीति भविष्यकाळ

(3) रीति वर्तमानकाळ

(4) वरील पैकी सर्व

उत्तर पर्याय क्रमांक 3

15) काळाचे मुख्य प्रकार किती?

(1) 2

(2) 3

(3) 4

(4) 6

उत्तर पर्याय क्रमांक 3

16) पूर्ण भुतकाळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?

(1) मी पुस्तक वाचत असे

(2) मी पुस्तक वाचत होतो

(3) मी पुस्तक वाचले होते

(4) मी पुस्तक वाचेल

उत्तर पर्याय क्रमांक 3

17) ‘तो नेहमी उशिरा येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.

(1) रीति भविष्यकाळ

(2) रीति भुतकाळ

(3) रीति वर्तमानकाळ

(4) साधा काळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

19) मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ कोणता आहे

(1) साधा भविष्यकाळ

(2)) पूर्ण भविष्यकाळ

(3) अपूर्ण भविष्यकाळ

(4) पूर्ण भूतकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 2

20) वाक्याचा काळ ओळखा – ताई वाचत असते.

(1) रीति वर्तमानकाळ

(2) रीति भूतकाळ

(3) अपूर्ण वर्तमानकाळ

(4) पूर्ण भूतकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 1

21) अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य पर्यायांतून निवडाः

(1) मी सहजपणे लंगडी खेळत असे

(2) मी सहजपणे लंगडी खेळत असते

(3) मी सहजपणे लंगडी खेळत आहे

(4) मी सहजपणे लंगडी खेळते

उत्तर पर्याय क्रमांक 3

22) आम्ही क्रिकेट खेळतो. या वाक्याचा भुतकाळ खालीलपैकी कोणता आहे?

(1) आम्ही क्रिकेट खेळू

(2) आम्ही क्रिकेट खेळणार

(3) आम्ही क्रिकेट खेळलो

(4) यापैकी नाही

उत्तर पर्याय क्रमांक 3

23) वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.

‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’

(1) रीति वर्तमानकाळ

(2) अपूर्ण भूतकाळ

(3) रीति भूतकाळ

(4) रीति भविष्यकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 3

24) खालील वाक्याचा काळ ओळखा?

‘मी रस्त्याने जात असेन.’

(1) साधा भविष्यकाळ

(2) अपूर्ण भविष्यकाळ

(3) रीति भविष्यकाळ

(4) पूर्ण भविष्यकाळ

उत्तर पर्याय क्रमांक 2

 

Related posts:

Leave a Comment