इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावरील नावाच्या क्रमाबाबत पुनर्विचार करून गुणपत्रक व प्रमाणपत्र हे प्रिलिस्ट यादी व प्रवेश पत्राप्रमाणेच मिळणेबाबत ssc hsc mark’s list certificate 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावरील नावाच्या क्रमाबाबत पुनर्विचार करून गुणपत्रक व प्रमाणपत्र हे प्रिलिस्ट यादी व प्रवेश पत्राप्रमाणेच मिळणेबाबत ssc hsc mark’s list certificate 

संदर्भ

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ शाखा (माध्यमिक, उच्च माध्यमिक) मालेगाव, जि. नाशिक यांचे जा.क्र.उ.भ.उ.शि.स/रा.क्र./२०२/२०२६/१४०२ दि.११/०५/२०२६ रोजीचे ईमेलव्दारे प्राप्त पत्र.

महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भिय पत्रानुसार सादर करण्यात येते की, फेब्रुवारी मार्च २०२६ परीक्षेपासून इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ते एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव व आडनाव या क्रमाने छापण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सदर निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदीमध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण इ.१० वी व इ.१२ वीच्या परीक्षा अर्ज भरताना मंडळाच्या अधिकृत ऑनलाईन प्रणालीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी नावे प्रथम आडनाव, नाव व शेवटी वडिलांचे / पालकांचे नाव या क्रमाने भरलेली आहेत. तसेच राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील जनरल रजिस्टर मध्ये देखील विद्यार्थ्यांची नोंद या पारंपारिक व अधिकृत पध्दतीने करण्यात आलेली आहे. विशेषतः राज्यातील उर्दू माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अनेक वर्षांपासून प्रथम आडनाव, नंतर विद्यार्थ्यांचे नाव आणि शेवटी पालकांचे नाव अशीच नोंद प्रचलित असून त्याच आधारावर बोर्डाचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले आहेत.

अशा परिस्थितीत नव्याने First Name, Father Name, Surname हा क्रम लागू केल्यास पुढील गंभीर अडचणी निर्माण होउ शकतात

१. शाळेच्या जनरल रजिस्टर व बोर्ड प्रमाणपत्रातील नावामध्ये तफावत निर्माण होईल.

२. विद्यार्थ्यांना भविष्यात प्रवेश, शिष्यवृत्ती, पासपोर्ट, आधार, स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय कागदपत्रांमध्ये अडचणी येउ शकतात.

३. अनेक विद्यार्थ्यांच्या नावाची ओळख बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण होउन कायदेशीर व प्रशासकीय

अडचणी उदभवू शकतात. ४. उर्दू माध्यम शाळांमधील पारंपारिक नाव नोंदणी पध्दतीशी विसंगती निर्माण होईल.

त्यामुळे वरील बाबी पाहता सदर निर्णयाचा पुनर्विचार करून फेब्रुवारी मार्च २०२६ परीक्षेमध्ये इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र हे प्रिलिस्ट यादी व प्रवेश पत्राप्रमाणेच मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

सदर बाब आपले कार्यकक्षेतील असल्याने संबंधितांचा विनंती अर्ज पुढील कार्यवाहीस्तव या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment