प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) अंतिम उत्तरसूची जाहीर scolarship exam final answer key declared 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) scolarship exam final answer key declared

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) अंतिम उत्तरसूची जाहीर scolarship exam final answer key declared

रविवार दि. २६ एप्रिल, २०२६

अंतिम उत्तरसूची

प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. ०७ मे, २०२६ रोजी परिषदेच्या https://puppssmsce.inhttps://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या https://puppssmsce.inhttps://www.mscepune.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.

ठिकाण – पुणे

दिनांक – २९/०५/२०२६

Related posts:

Leave a Comment