सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संचमान्यतेबाबत sanchmanyata 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संचमान्यतेबाबत sanchmanyata

उपरोक्त विषयांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, उपरोक्त विषयी शासन धोरणानुसार सन २०२५-२६ च्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक/वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कमवि यांच्या संचमान्यता ऑनलाईन प्रणालीत करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक/वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कमवि ची खालील माहितीची संचिका आपल्या जिल्हयातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हापरीषदा यांचे कार्यालयात दिनांक २७/०५/२०२६ ते २९/०५/२०२६ पर्यंत जमा करावी सदर माहितीच्या आधारे आपल्या उमावि / कमविची संचमान्यता उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करता येईल.

१) सन २०२४-२५ ची संचमान्यता

२) तुकडी मान्यता आदेश

३) विषय मान्यता आदेश

४) कार्यरत कर्मचारी वैयक्तीक मान्यता आदेश व सुधारित वै. मान्यता आदेश असल्यास

५) अनुदान/टप्पाअनुदान आदेश

६) प्राचार्य/मुख्याध्यापक नाव व संपर्क क्रमांक

७) सरल/संचमान्यता प्रणालीत काम करण्याऱ्या कर्मचारी याचे नाव व संपर्क क्रमाक

८) विषय निहाय कार्यभार तक्ता

९) पवित्र प्रणालीव्दारे पदभरती साठी ज्या संस्थानी शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक/मा.व.क. कार्यालयामध्ये बिदूनामावली प्रस्ताव सादर केलेली आहे त्याची संचमान्यता प्राधान्याने करण्यात येईल बिंदूनामावली सादर केल्याची प्रत सोबत सादर करावी.

१०) वरिष्ठ महाविद्यालय संलग्न विज्ञान शाखा असलेली उमावि मान्यता आदेशासह माहिती सादर करावी.

Related posts:

Leave a Comment