आयडॉल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया राबविण्याबाबत idol teacher selection
विषय- आयडॉल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया राबविण्याबाबत
संदर्भ-
१. शासन निर्णय क्र. नमाशा-२०२५/प्र.क्र.१४/ टीएनटी-४ दिनांक: १६/०४/२०२५
२. क्र. संकीर्ण : २०२६/प्र.क्र.१२/ टीएनटी ४, दिनांक ११.०३.२०२६ चे पत्र.
३. मा. आयुक्त शिक्षण यांचे पत्र जा.क्र./आस्था-ब-१२१/२०२६/७८८८१८ दि.१७/०३/२०२६
४. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांची आढावा बैठक दि १०/०५/२०२६
मा. महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे.
यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व आपण यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आहात. त्याअनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समित्यांनी पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करुन याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
यापूर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिनांक ७/७/२०२५ च्या पत्राद्वारे राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून निवड झालेले राज्यस्तरावर ४२ व जिल्हास्तरावर ३३२ आयडॉल कार्यरत राहतील व सदरील प्रक्रियेद्वारे प्रत्येक केंद्रातील दोन आयडॉल शिक्षकांची नव्याने निवड करावी. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.









