६ वर्षावरील कालावधीच्या थकीत देयकांना प्रशासकीय मंजूरीसाठी शासनास सादर करणेबाबत सर्व लेखाशीर्ष thakit deyak manjuri paripatrak
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण ४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दि. १५.०७.२०१७
२. शासन पत्र वेतन/२०२२/प्र.क्र.१७/टिएनटी-३, दि. २५/०२/२०२२.
३. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ०८/०५/२०२६ रोजी राज्य मंडळ कार्यालय येथे आयोजित बैठकी मध्ये दिलेल्या सुचना.
दिनांक ३१/०३/२०२६ अखेर पर्यंत ०१ ते ०६ वर्षांचा कालावधी हा प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून गणण्यात येत होता. त्यानुसार देवकाचा प्रत्यक्ष कालावधी कोणताही असला तरी त्याचा अदायगी बाबत ज्या तारखेस मान्यता मिळाली त्या तारखे पासून पुढे ६ वर्ष कालावधी पर्यंतची देयके संचालनालयाच्या स्तरावर मंजुर करण्यात येत होती.
तथापि संदर्भ क्र ३ नुसार देयकाच्या कालावधीची गणना प्रशासकीय मान्यता तारखेपासून न करता प्रत्यक्ष कालावधी ग्राहय धरुन ६ वर्षाच्या वरील कालावधीचे देयके शासनास सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्राप्त निर्देशानुसार एप्रिल २०२० पासून पुढील कालावधीची देयके संचालनालयाच्या स्तरावर मान्य करता येणार
असून सन मार्च २०२० व त्यापुर्वीच्या कालावधीतील देयके शासनास प्रपत्र-क (C) मध्ये सादर करावयची आहेत.
त्याअनुषंगाने संचालनालयाच्या स्तरावर प्राप्त झालेली थकित देयके शासनाकडे पुढील मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक असल्याने प्रपत्र-क मध्ये शासन पत्र क्रमांक वेतन-१२२१/प्र.क्र.४६/टिएनटी-३ दिनांक ०५/०७/२०२१ मधील तपासणी सूचनानुसार फेर सादर करणे साठी परत करण्यात येत आहेत.
सदरील थकित देयके संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने प्रपत्र-क (C) मध्ये तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन पध्दतीने शिफारशीसह सादर करावी. इतर ६ वर्ष कालावधीच्या आतील देवके नियमित पध्दतीने प्रपत्र व मध्ये संचालनालयास मान्यतेस्तव सादर करावीत.
सन २०२६-२७ पासून पुढील कालावधीत सर्व देयके केवळ ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात यावी ज्या प्रकरणात अनेक पुरावा पत्राची गरज आहे अशा प्रकरणात तसेच न्या. प्रकरणे व लोकायुक्त प्रकरणे यांची नस्ती (पेजींग करून) स्कॅन करून Upload करण्यात यावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करुन Upload करण्यात यावी.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download










