सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०२ मधील प्रवेशाच्या मुदतवाढीबाबत right to education online addmission
संदर्भ :
– १. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई २५ टक्के/टे-८०१/२०२५/१७२३५१६, दि. १५-०२-२६
२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/२०२६/५३००, दि. १३-०५-२६
३. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/२०२६/१९१६०३६, दि. २२-०५-२६
४. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई-८०१/२०२६/५३६९, दि. २९-०५-२६
५. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई-८०१/२०२६/१९३७०२१, दि. ०३-०६-२६
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार सन २०२६-२७ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रतिक्षाधीन यादीच्या दुसरी टप्याची मुदत दि. १२-०६-२०२६ पर्यंत देण्यात आली होती.
तरी आरटीई २५ टक्के प्रतिक्षाधीन यादी दुसरा टप्पा दि. १३-०६-२०२६ ते दि. १९-०६-२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. प्रतिक्षाधिन यादी दुसऱ्या टप्प्यातील ही अंतिम मुदतवाढ असेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.











