ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित शैक्षणिक ग्रामसभेत शिक्षणविषयक बाबींवर चर्चा करण्याबाबत educational discussion 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित शैक्षणिक ग्रामसभेत शिक्षणविषयक बाबींवर चर्चा करण्याबाबत educational discussion 

संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. /416, दिनांक 07.08.2026.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडून ऑगस्ट, 2026 महिन्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक ग्रामसभेमध्ये शाळांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगानं शिक्षणविषयक खालील बाबींचा समावेश करून त्यावर चर्चा करण्यात यावी. याबाबत कळविले आहे.

1. शाळेतील पटनोंदणी व विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुलांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांची पटनोंदणी करणे.

शाळाबाह्य मुलांची पुन्हा शाळेत पटनोंदणी करणे,

विशेष गरजा असलेल्या मुलांची पटनोंदणी करणे.

सर्व गैरहजर मुलांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे,

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रमाणपत्र व शिक्षणासाठी आवश्यक प्रयत्न करणे.

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेशक शिक्षणाची व्यवस्था करणे.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करणे.

2. मूलभूत सुविधा

ग्रामसभेमध्ये शाळेतोल खालील मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात यावा :

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

शाळेची रंगरंगोटी.

शाळा इमारत, वर्गखोल्या, स्वयंपाकघर, खिडक्या, दरवाजे, फरशी आदीची दुरुस्ती.

संरचना निर्मित व नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम,

विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था.

शिक्षकांसाठी आवश्यक फर्निचर,

स्वतंत्र स्वच्छतागृह.

खेळाचे मैदान.

वीजपुरवठा.

बागबगीचा.

रॅम्प व रेलिंगची सुविधा.

3. भौतिक व मानवी सुविधा

शिक्षकांची उपलब्धता,

विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन,

शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर.

मूल्यमापनासाठी आवश्यक सुविधा.

ग्रंथालय, प्रयोगशाळा व ई-लर्निंग सुविधा.

शैक्षणिक साहित्याची उपलब्धता,

खेळ व सांस्कृतिक साहित्य,

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य,

शेक्षणिक सहली व प्रदर्शन मेळावे.

इतर स्थानिक शैक्षणिक बाबी.

4. कौशल्य विकास

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील बाबीवर चर्चा करण्यात यावी :

खेळाचे प्रशिक्षण,

संगीत, वाद्य, नृत्य व अभिनय कौशल्य प्रशिक्षण,

संगणक व तंत्रज्ञान प्रशिक्षण,

5. शाळा व्यवस्थापन व इतर बाबी

शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्यामत बैठका,

पालक सभा.

ग्रामपंचायतीसोबत समन्वय बैठका.

शाळेतील स्वच्छता व नीटनेटकेपणा.

मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता.

आरोग्य विषयक वावी.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन.

शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण,

आपल्या स्तरावरून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात ही विनंती.

आपल्या अधिक माहितीसाठी संदर्भीय पत्र जोडले आहे.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment