महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) – २०२६ क्षेत्रिय अधिकारी व केंद्रसंचालक मार्गदर्शक पुस्तिकेतील बदलाबाबत mahatet exam
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) – २०२६ चे आयोजन दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.
-तथापि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) २०२६ क्षेत्रिय अधिकारी व केंद्रसंचालक मार्गदर्शक पुस्तिकेतील दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबतच्या मार्गदर्शक सूचना मधील पान क्र. ५८ वरील मुद्दा क्र. ११ (अ) “फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील”.
“या ऐवजी असे वाचावे”
“दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच लेखनिक व अनुग्रह कालावधी अनुज्ञय राहील. तसेच इतर सर्व प्रकारच्या दिव्यांग ( ४०% + दिव्यांगत्व असलेल्या) उमेदवारांना सुद्धा प्रत्येक तासाला 20 मिनिटे अतिरिक्त वेळ (अनुग्रह कालावधी ) अनुज्ञेय राहील.











