स्थानिक स्वराज्य संस्थेतील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची माहिती भरणेची सुविधा सरल पोर्टलवर उपलब्ध झालेबाबत anshkalin nideshak paripatrak
संदर्भ : १. शासन निर्णय क्र. एसएसए-२०२१/प्र.क्र.३०/एस.डी.-१, दि.०५.०६.२०२५.
२. संचालनालयाचे पत्र जा.क्र./प्राशिसं/जि.प/२०२६-२७/संकीर्ण दि.१४.०५.२०२६
३. संचालनालयाचे पत्र जा.क्र. प्राशिसं/टे-३०१/२०२६/०५४६५ दि.१४.०६.२०२६
४. संचालनालयाचे पत्र जा. क्र. प्राशिसं/ टे. ३०२/१९७४५४० दि.२२/६/२०२६
उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी च्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसंदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार १०० किंवा त्यापेक्षा अधिक आधार वैध विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अंशकालीन निदेशक पदांबाबत निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व संबंधित मुख्याध्यापकांना शासन निर्णयातील तरतुदींनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देणेबाबत संचालनालयाचे संदर्भ पत्र क्र. २ व ३ नुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी उपरोक्तप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी च्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव अंशकालीन निर्देशक यांची माहिती भरण्याची सुविधा
संचमान्यता २०२५-२६ नुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शाळा जेथे पटसंख्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक आधार वैध विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये भरण्याची सुविधा सरल पोर्टल वरील स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी उपरोक्त अंशकालीन निदेशक यांची माहिती सरल (SARAL) पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यायावत करण्याबाबत आपल्यास्तरावरुन इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शाळा जेथे पटसंख्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक आधार वैध विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.










