INSPIRE-MANAK योजना सत्र 2026-27 करीत Online नामांकने सादर करणेबाबत
संदर्भ:- 1. मा. संदीप बंसल, शास्त्रज्ञ C, S&T C B Division (INSPIRE-MANAK) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तंत्रज्ञान भवन, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. DST/S&TCB/INSPIRE-MANAK/Nominations/2026-27 दि.13.07.2026
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची INSPIRE-MANAK (Million Minds Augmenting National Aspirations and Knowledge) ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख (Flagship) योजना आहे. या योजनेअंतर्गत सन 2026-27 मध्ये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांतील इ. 6 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 5 उत्तम, नावीन्यपूर्ण, मूळ कल्पनांची Online नामांकने www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर सादर करावयाची आहेत. या करिता नामांकने सादर करण्याचा कालावधी 15 जुलै 2026 पासून सुरू झालेला असून अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. वेळोवेळी आपल्या जिल्ह्याची नामांकनाची स्थिति त्यादृष्टीने सर्व शाळा मुख्याध्यापक यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.
आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. सर्व शाळांमध्ये अनिवार्यपणे नावीन्यपूर्ण कल्पना पेटी (Innovative idea box) लावण्यात यावा अशा प्रकारची कार्यवाही आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्वरित करण्यात यावी. आपण स्वतः या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या योजनेची दर्जेदार व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
सहपत्र : संदर्भीय पत्र










