शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ मधील तरतूदीनुसार अपात्र ठरलेल्या तथापि, तदनंतर पात्र ठरत असलेल्या प्राथमिक शाळा व तुकड्या यांची माहिती सादर करणेबाबत shala tukdya mahiti
संदर्भ-१. शासन निर्णय क्रः- माशा-२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६.०२.२०२३.
२. संचालनालयाचे पत्र क्रमांक: प्राशिसं/खाप्राशा/पटसख्या/२०२५/ड-५०४/१५११२२०, दि. ०३/११/२०२५.
३. शासन पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१०/एसएम-४, दिनांक:-०८.०७.२०२६.
संदर्भाधीन अ.क्र. १ चे शासन निर्णयानुसार सन २०२२-२३ वर्षाच्या संचमान्यतेनुसार, आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निश्चित होणारा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अनुदानास पात्र ठरविण्यात आला आहे.
तथापि शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ मधील अटी च्या अनुषंगाने काही खाजगी प्राथमिक शाळा / वर्ग व तुकडया या क्षेत्रिय स्तरावर अपात्र ठरल्या आहेत. सदर शाळा, वर्ग व तुकड्या या नंतरच्या सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असल्याची निवेदने शासनास/संचालनालयास प्राप्त झाली आहेत,
त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.०६.०२.२३ नुसार अनुदानास पात्र ठरलेल्या तथापि सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार क्षेत्रिय स्तरावर अपात्र ठरलेल्या परंतु, सन २०२३-२४ च्या अथवा त्यानंतरच्या संचमान्यतेनुसार पात्र ठरत असलेल्या प्राथमिक शाळा / तुकड्या व त्यावरील कार्यरत कर्मचारी संख्या यांची योग्य व अचूक एकत्रित माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यानी सोबत दिलेल्या प्रपत्रात दिनांक १७/०७/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करावी.
विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास आपल्या माहिती अभावी सदरील शाळा अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल याची नोंद घ्यावी.










