बालचित्रकला स्पर्धा – २०२६ परिपत्रक balchitrakala competition
संदर्भीय शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे
मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका / महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी

शाळेमार्फत करावी. बालवित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्याश्यांची नोंदणी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किया https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भरावयचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणाया,









