साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण lokshahir annabhau sathe jayanti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण lokshahir annabhau sathe jayanti 

सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती

आज आपण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक कवी, लोककवी, समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते.

त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील

वाटेगाव येथे झाला. अतिशय गरिबीत त्यांचे बालपण गेले. जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभाव यामुळे शिक्षण घेता आले नाही. पण तरीही त्यांनी अनुभवातून, लोकजीवनातून आणि मेहनतीच्या बळावर साहित्यसंपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन हे समाजातील शेवटच्या माणसासाठी होते. त्यांनी सुमारे ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५ नाटकं आणि असंख्य पोवाडे, लावण्या, गीते लिहिली.

त्यांची “फकिरा” ही कादंबरी विशेष गाजली. यामध्ये त्यांनी दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि बंडखोरी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांनी समाजाला जागृत केलं, आणि त्यांचे शब्द हे अन्यायाविरुद्ध उठलेली क्रांतीची हाक ठरली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…..

Related posts:

Leave a Comment