परीक्षा विषयक कामकाजासंदर्भात सूचना, सुधारणा कळविणेबाबत pariksha kamkaj instructions improvement
संदर्भ :- राज्य मंडळाचे क.रा.मं./ परीक्षा-८/३१५९/दिनांक २८.०७.२०२६ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, संदर्भिय पत्रानुसार सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) मध्ये परीक्षा विषयक कामकाजासंदर्भात सूचना, सुधारणा सादर करणेबाबत या कार्यालयास कळविले आहे. त्याकरीता खालील मुददे निर्धारित करण्यात आलेले आहेत.
१. राज्य मंडळ परीक्षा कामकाज सुधारणा करणे.
२.NEP धोरणानुसार राज्य मंडळाच्या परीक्षा पध्दतीमध्ये उपाययोजना सुचविणे.
राज्य मंडळा मार्फत दरवषी इ.१० वी व इ.१२ वी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दोनदा आयोजित करण्यात येतात. आपण स्वत राज्य मंडळाच्या परीक्षांकरीता एक महत्वाचा घटक म्हणून आपणास मंडळामार्फत सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहात. सदर परीक्षा अधिक पारददर्शक व सुलभ होण्यासाठी आणि कोणतीही अनियमितता होणार नाही, यासाठी आपल्याकडुन सूचना/नाविण्यपुर्ण कल्पना मागविण्यात येत आहेत.
तरी याबाबत आपल्या सूचना/नाविण्यपूर्ण कल्पना कार्यालयाच्या sschsc.mumbaiboard@gmail.com या अधिकृत ईमेल आयडीवर दिनांक ३१.०७.२०२६ पर्यंत पाठविण्यात याव्यात.










