जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम अधिसूचना birth death registration adhiniyam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम अधिसूचना birth death registration adhiniyam 

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक आरोग्य विभाग

१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार, नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ जुलै, २०२६.

अधिसूचना

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९.

क्रमांक जमूनों-२०२४/१६/प्र.क्र. ७०/ कु.क.२. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (१९६९ चा १८) याच्या कलम ३० द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकारच्या मान्यतेने याद्वारे महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम, २००० मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढीलप्रमाणे महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ करीत आहे:-

१. संक्षिप्त नाव व विस्तार. (१) या नियमांस, महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ असे म्हणावे.

(२) ते शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

२. महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम, २००० (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य नियम” असा केला आहे) याच्या नियम ५ मध्ये पोट-नियम (३) नंतर, पुढील पोट-नियम जादा दाखल केले जातील :-

(४) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी नाव आले असेल तेथे ते (प्रथम नाव), (मधले नाव), (आडनाव) या स्वरूपात नमूद करण्यात येईल आणि त्यामध्ये कोणत्याही संक्षिप्त रूपांचा समावेश असणार नाही.

(५) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी दिनांक आला असेल तेथे तो दिवस-महिना-वर्ष या स्वरूपात नमूद करण्यात येईल. जेथे दिनांक असेल तेथे दिवस दोन अंकी, महिना दोन अंकी आणि वर्ष हे चार अंकी असे नमूद करण्यात येईल.

(६) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा), नियम, २०२६ यामध्ये निर्देशिलेल्या सर्व नमुन्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी पत्ता आला असेल, तेथे त्यामध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा, शहर किंवा गाव, प्रभाग क्रमांक, (शहराच्या बाबतीत उपलब्ध असल्यास) परिसर, घर क्रमांक व पिन कोड यांचा समावेश असेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जुलै ३१, २०२६/ श्रावण ९, शके १९४८

३. मुख्य नियमामधील नियम ७ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल.-

“७. कलम १० ची पोट-कलमे (२) व (३) अन्वये प्रमाणपत्राचा नमुना. कलम १० ची पोट-कलमे (२) व (३) अन्वये आवश्यक असल्यास मृत्यूच्या कारणासाठी प्रमाणपत्र, आजाराचे पूर्ववृत्त यांसह अनुक्रमे नमुना क्रमांक ४ व नमुना क्रमांक ४-अ मध्ये देण्यात येईल आणि निबंधक, जन्म व मृत्यूच्या नोंदवहीत आवश्यक माहिती भरल्यानंतर अशी सर्व प्रमाणपत्रे उपमुख्य निबंधक, जन्म व मृत्यु, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नमुन्यात भरलेली माहिती ज्या महिन्यातील आहे त्या महिन्यानंतरच्या पुढील महिन्यात १० तारखेपर्यंत पाठवील.”.

४. मुख्य नियमाच्या नियम ८ मध्ये, (एक) समास शीर्षामधील “नोंदणीवहीतील नोंदीचा द्यावयाचा उतारा” या मजकुराऐवजी, “जन्म किंवा मृत्यू नोंदणीचे द्यावयाचे प्रमाणपत्र” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (१) ऐवजी पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल :-

“(१) कलम १२ अन्वये नोंदवहीतील नोंदीच्या उताऱ्यावर आधारित माहिती देणाऱ्या व्यक्तीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य कोणत्याही रीतीने जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र नमुना क्रमांक ५ किंवा यथास्थिति, नमुना क्रमांक ६ मध्ये देण्यात येईल.”

(तीन) पोट-नियम (२) ऐवजी, पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल :-

“(२) कलम ८ च्या पोट-कलम (१) मधील खंड (अ), (अअ), (अब) आणि (अक) मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, घरी घडलेल्या जन्म व मृत्यूच्या ज्या घटना, निबंधक, जन्म व मृत्यू यांना थेट कळविल्या आहेत, असा घर प्रमुख किंवा कुटुंब प्रमुख किंवा यथास्थिति, त्याच्या अनुपस्थितीत घरात उपस्थित असलेला जवळचा नातेवाईक किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपस्थित असलेली सर्वांत ज्येष्ठ प्रौढ व्यक्ती, दत्तक पालक, पालक आणि यथास्थिति, जैविक पालक, इतिवृत्त कळविल्यापासून तीस दिवसांच्या आत, जन्म अथवा मृत्यूसंबंधीचे प्रमाणपत्र इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य रीतीने निबंधक, जन्म व मृत्यू यांच्याकडून मिळवील.”.

(चार) पोट-नियम (३) मध्ये, –

(अ) “तीस दिवसांच्या आत,” या मजकुरानंतर, “इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य रीतीने” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल;

(ब) “उतारे” या मजकुराऐवजी, “प्रमाणपत्र” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(क) “घरात उपस्थित असलेल्या” या मजकुरानंतर, “किंवा, त्यांच्या अनुपस्थितीत, उपस्थित सर्वात ज्येष्ठ प्रौढ

व्यक्ती” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

(पाच) पोट-नियम (४) मध्ये, –

(अ) “खंड (ब) ते (इ) मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे संस्थांमध्ये घडलेल्या जन्म आणि मृत्यूच्या” या मजकुराऐवजी, “खंड (ब), (क), (ड), (डअ), (डब), (डक), आणि (इ) यामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे जन्म आणि यथास्थिति

मृत्यूच्या” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

येईल; (ब) “प्राप्त करून घेईल” या मजकूराऐवजी, “इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य रीतीने मिळवील” हा मजकूर दाखल करण्यात

(क) “उतारा” या मजकुराऐवजी, “प्रमाणपत्र” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(६) पोट-नियम (५) मध्ये, “उतारा” या मजकुराऐवजी, “प्रमाणपत्र” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

५. मुख्य नियमांच्या नियम ९ मध्ये, –

(एक) पोट-नियम (१) मधील “दोन रुपये” या मजकुराऐवजी, “वीस रुपये” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (२) ऐवजी, पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल :-

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जुलै ३१, २०२६/ श्रावण ९, शके १९४८

“(२) कोणत्याही जन्म किंवा मृत्यूची माहिती, निबंधकास ही घटना घडल्यापासून तीस दिवसानंतर परंतु एक वर्षाच्या आत उशिरा दिली गेली असेल तर जिल्हा निबंधक किंवा याबाबतीत विहित केलेला अधिकारी यांच्या लेखी परवानगीने आणि पन्नास रुपये इतकी विलंब फी भरून आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य रीतीने नमुना क्रमांक-१४ मध्ये स्वंय-प्रमाणित दस्तऐवज, सादर केल्यानंतरच नोंदणी करण्यात येईल.”.

(तीन) पोट-नियम (३) ऐवजी, पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल :-

“(३) कोणत्याही जन्म किंवा मृत्यूची माहिती निबंधकास ही घटना घडल्यापासून एक वर्षानंतर उशिरा दिली गेली असेल तर, जन्म किंवा मृत्यू ज्या क्षेत्रामध्ये घडला आहे त्या क्षेत्राची अधिकारिता ज्यांच्याकडे आहे, असा केवळ जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केलेला कार्यकारी दंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाद्वारे आणि शंभर रूपये विलंब फी भरून नोंदणी करण्यात येईल.”.

६. मुख्य नियमाच्या नियम १० मधील, पोट-नियम (२) मध्ये, “(हे करण्यापूर्वी ग्रामीण भागातील निबंधक संबंधित कार्यक्षेत्रासाठी गट विकास अधिकारी याची परवानगी घेईल)” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी याची परवानगी घेईल” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

७. मुख्य नियमाच्या नियम ११ मधील, –

(एक) पोट-नियम (२) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी, संबंधित शहरी भागासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी किंवा मुख्याधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी यांना कळवील” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी यांना कळवील” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (३) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(तीन) पोट-नियम (६) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

८. मुख्य नियमांच्या नियम १२ मधील, “नमुना क्रमांक १, २ व ३” या मजकुराऐवजी, “नमुना क्रमांक १, १अ, २ व ३” हा

मजकूर दाखल करण्यात येईल.

९. मुख्य नियमांच्या नियम १३ ऐवजी, पुढील नियम दाखल करण्यात येईल:-

“१३. कलम १७ खाली देय फी आणि डाक खर्च. (१) कलम १७ खाली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा अन्य प्रकारे अथवा करण्यात येणारा शोध अथवा जन्म किंवा मृत्यू दाखला अथवा अनुपलब्धता दाखला यासाठी देय फी खालीलप्रमाणे असेल :-

(२) जन्म अथवा मृत्यूच्या संबंधित नोंदवहीतील उताऱ्याच्या आधारावरील असा कोणताही दाखला, निबंधक अथवा राज्य शासनाद्वारे याबाबतीत प्राधिकृत केलेला अधिकारी नमुना क्रमांक ५ अथवा यथास्थिति, नमुना क्रमांक ६ मध्ये देईल आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ (२०२३ चा ४७) याच्या कलम ७५ अन्वय तरतूद केलेल्या पद्धतीने प्रमाणित करील.

(३) जन्म किंवा मृत्यूच्या एखाद्या विशिष्ट घटनेची नोंद न झाल्याचे आढळल्यास अथवा एखाद्या विशिष्ट वर्षाची जन्म आणि मृत्युची नोंदवही उपलब्ध नसल्यास निबंधक नमुना क्रमांक १० (अ) किंवा यथास्थिति, १० (ब) मध्ये अनुपलब्धता दाखला देईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जुलै ३१, २०२६/ श्रावण ९, शके १९४८

(४) असा कोणताही दाखला अथवा अनुपलब्धता दाखला, तो मागवणाऱ्या व्यक्तीस देता येईल अथवा यासाठी डाक खर्चाची देय रक्कम त्याने दिल्यानंतर डाकेने पाठविता येईल.”

१०. मुख्य नियमाच्या नियम १४ मधील, –

(एक) पोट-नियम (१) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (२) मध्ये, “(ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी)” या मजकुराऐवजी, “(जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी)” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

११. मुख्य नियमाच्या नियम १६ मधील, –

(एक) पोट-नितम (१) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी आणि संबंधित शहरी भागासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी किंवा मुख्याधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (२) ऐवजी, पुढील पोट-नियम दाखल करण्यात येईल :-

“(२) उक्त अधिकाऱ्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कलम २३ च्या पोट-कलमे (१), (२) व (४) खालील अपराधांबद्दल दोनशे पन्नास रूपयांपेक्षा अधिक नसेल, पोट-कलम (३) खालील अपराधांबद्दल पन्नास रूपयांपेक्षा अधिक नसेल व कलम २३ ची पोट-कलमे (१अ) आणि (४अ) खालील अपराधांबद्दल प्रत्येक जन्म अथवा मृत्यूच्या बाबतीत एक हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल इतकी रक्कम भरल्यानंतर असा कोणताही अपराध प्रशमित करता येईल.

१२. मुख्य नियमांच्या नियम १६ नंतर, पुढील नियम दाखल करण्यात येईल :-

“१६-अ अपील कलम २५अ च्या पोट-कलम (१) खालील अपील, नमुना क्रमांक १५ मध्ये दाखल केले जाईल”.

१३. मुख्य नियमांच्या नियम १७ मधील, –

(एक) पोट-नियम (२) मध्ये, “निबंधकास विलंबित नोंदणीची परवानगी देणारे न्यायालयीन आदेश आणि याबाबतीत विनिर्दिष्ट केलेले प्राधिकारी यांचे कलम १३ अनुसार मिळालेले आदेश” या मजकुराऐवजी, “निबंधकास कलम १३ च्या पोट-कलम (२) अनुसार विलंबित नोंदणीची परवानगी देणारे, आणि कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार जारी केलेले आदेश” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(दोन) पोट-नियम (३) मध्ये, “पोट-कलम (३)” या मजकुराऐवजी, “पोट-कलमे (२) आणि (३)” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(तीन) पोट-नियम (४) मध्ये, “ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी” या मजकुराऐवजी, “जिल्हा निबंधक, अतिरिक्त जिल्हा निबंधक किंवा यथास्थिति, याबाबतीत संबंधित क्षेत्रासाठी नियुक्त केलेला अधिकारी” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

१४. मुख्य नियमांच्या नियम १८ मधील, “अथवा मनी ऑर्डर अथवा पोस्टल ऑर्डरने” या मजकुराऐवजी, “अथवा मनी ऑर्डर अथवा पोस्टल ऑर्डर अथवा ऑनलाईनने” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

१५. मुख्य नियमांमधील, –

(एक) नमुना क्रमांक १, १अ, २, ३, ४, ४अ, ५, ६, ७, ८, ९, १०अ, १०व, ११, १२ आणि १३ या मजकुराऐवजी, अनुक्रमे नमुना क्रमांक १, १अ, २, ३, ४, ४, ५, ६, ७, ८, ९, १०अ, १०ब, ११, १२ आणि १३ हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(दोन) नमुना १३ नंतर नमुना क्रमांक १४ आणि १५ जादा दाखल करण्यात येईल.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment