“हर घर तिरंगा अभियान २०२६” प्रभावीपणे राबविणेबाबत har ghar tiranga 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“हर घर तिरंगा अभियान २०२६” प्रभावीपणे राबविणेबाबत har ghar tiranga

संदर्भ : 1. पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचे D.O. क्र. M/44/2026-GC, दिनांक 24 जुलै 2026.

2. महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचे क्र. संकीर्ण-8225/प्र. क्र. 407/सांका-4,

दिनांक- 27.07.2026

महोदय/महोदया,

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत “हर घर तिरंगा अभियान 2026″ प्रभावीपणे राविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. प्रत्येक घरावर तसेच सार्वजनिक संस्थांवर राष्ट्रध्वज फडकविण्यास प्रोत्साहन देणे, तिरंग्याशी नागरिकांचे भावनिक नाते अधिक दृढ करणे तसेच देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीची भावना बळकट करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायती राज संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्याअनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पंचायत राज संस्था/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

1. अभियान कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांची सुरुवात, शक्य असल्यास, ‘वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने करण्यात यावी. तसेच अभियानांतर्गत आयोजित सर्व प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्येही “बंदे मातरम्” चे सामूहिक गायन तसेच राष्ट्रध्वज (तिरंगा) फडकविणे/ प्रदर्शित करणे यांचा समावेश करण्यात यात्रा.

2. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविला जाईल, यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून उपलब्ध सर्व साधनसंपत्तीचा उपयोग करण्यात यावा.

3. पंचायत भवनावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा. तसेच पंचायती राज संस्थांमधील प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनधीच्या निवासस्थानीही राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा.

4. ऑभियान कालावधीत राष्ट्रध्वजाचे महत्य तसेच ध्वज संहितेतील तरतुदीवायत सर्वगामान्य नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम गर्दायण्यान यायेत.

5. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा कायम राखून विशेष तिरंगा रॅली/ध्वज फेरी आयोजित करण्यान यात्री आणि नार्गारकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात यावा.

6. अभियानांतर्गत आयोजित उपक्रमांची वैयक्तिक तसेच समूह छायाचित्रे घेऊन, स्थळ व दिनांक नमूद केलेल्या संक्षिप्त माहितोसमवेत नोडल अधिकारी prashant.rh@nic.in यांना पार्टावण्यात यावीत.

7. विविध स्तरांवरील अधिकृत ध्वजारोहण समारंभ

(i) जिल्हा स्तर : जिल्हा परिषद कार्यालयात अध्यक्ष यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी, लोकप्रनिधी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण करण्यात यावे. त्यानंतर राष्ट्रगीत व अल्प मनोगत आयोजित करण्यान यावे.

(ii) तालुका/पंचायत समिती स्तर : पंचायत समिती कार्यालयात सभापती/प्रमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून वरीलप्रमाणेच कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.

(iii) ग्रामपंचायत स्तर : ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून वरीलप्रमाणेच कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.

याशिवाय, नागरिकांना Har Ghar Tiranga पोर्टलवर राष्ट्रध्वज फडकविण्यावायतच्या मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी तसेच तिरंग्यासह छायाचिन्ने अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच संबंधित सामाजिक माध्यमांवर अभियानाशी संबंधित प्रसिध्दी करताना विहित हॅशटॅगचा वापर करण्यात यावा.

सदर अभियानाची अंमलबजावणी उत्साहपूर्ण वातावरणात, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून व व्यापक लोकसहभागाने करण्यायावत संबंधितांना सूचना द्याव्यांत ही विनंती.

संदर्भीय पत्रे आपल्या अधिक माहितीसाठी सोबत जोडले आहे.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment