आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रांमधील पदस्थापित अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेल्या सवलती व सुविधा यांचा आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्याबाबत karmachari savlati suvidha
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही-२०१८/प्र.क्र.५०/का.१२ (ई-१६१०९०३). मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.
दिनांक : १८ ऑगस्ट २०२६.
संदर्भ
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएफ-२०००/प्र.क्र.३/बारा, दि.०६.०८.२००२.
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२००९/प्र.क्र.१६७/कार्या.१२, दि.२४.०१.२०१७.
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-
२०१८/प्र.क्र.५०/कार्या. १२, दि.०३.१२.२०२०.
शासन निर्णय.
आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रांमधील पदस्थापित अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेल्या सवलती व सुविधा यांचा आढावा घेण्यासाठी, याद्वारे, पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे:-
२. उक्त समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहील-
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएफ-२०००/प्र.क्र.३/बारा, दि.०६.०८.२००२ यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सवलती व सुविधांचा आढावा घेऊन शासनास यथायोग्य शिफारस करणे.
३. उक्त समितीने आपला अहवाल सहा महिन्यांत शासनास सादर करावा.
४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०८१८१८०११८६३०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










