मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक, भांडार सहायक किंवा कॉम्प्युटर या पदावरील कर्मचा-यांमधून वरिष्ठ सहायक पदावर 25% निवडीने भरणे competitive exam paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक, भांडार सहायक किंवा कॉम्प्युटर या पदावरील कर्मचा-यांमधून वरिष्ठ सहायक पदावर 25% निवडीने भरणे competitive exam paripatrak 

संदर्भ : 1) अपर आयुक्त (आस्थापना), अमरावती विभाग, अमरावती यांचे पत्र क्र. विकास/आस्था/सप्रअ/कावि-215/2026, दि.16.03.2026 रोजीचे पत्र.

2) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी2018/प्र.क्र.366/16-ब, दि.07.05.2021

3) सामान्य प्रशासन विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.84/2026 (E-1606386) दि.03.07.2026

महोदय,

उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिले

आहेत,

मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक 04.08.2017 रोजीच्या निर्णयान्वये पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाल्यामुळे सद्यःस्थितीत मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षेद्वारे पदभरती केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात येत आहे. त्यामुळे सदर पदासाठी बिंदूनामावली तपासण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सबब, वरिष्ठ सहाय्यक या संवर्गाच्या मंजूर पदांपैकी २५% निवडीने भरावयाची पदे ही निम्न संवर्गातून मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवडीने भरण्यात यावीत.

उपरोक्तनुसार तपासून आवश्यकती कार्यवाही करावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment