सर्व शाळांमध्ये इको क्लब स्थापन करणेबाबत ecoclubs paripatrak
२) इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत “एक पेड मां के नाम” या शिर्षातंर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविणेबाबत.
संदर्भ:- १) केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.८-८/२०२६-MEC, Date २७/०५/२०२६
२) केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. दि. ०२/०६/२०२६
३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक MPSP/५७/२०२६-MPSP-DYD PROGRAM/ADMIN -I/२३०२२४९/२०२६, दि. ०४/०६/२०२६
४) केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. दि. १६/०७/२०२६
५) या कार्यालयाचे पत्र क्रमांक MPSP/५७/२०२६-MPSP-DYD PROGRAM/ADMIN -१/२३०२२४९/२०२६, दि. १६/०७/२०२६.
महोदय,
संदर्भिय पत्रांचे कृपया अवलोकन व्हावे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यासाठी १०० % सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून त्याबाबतची माहिती http://ecoclubs.education.gov.in या पोर्टलवर अपलोड करणेबाबत या कार्यालयाच्या संदर्भिय पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले होते.
इको क्लब फॉर मिशन जागतिक पर्यावरणीय उपक्रम २०२६-२७ च्या पोर्टलवर दि. १७/०८/२०२६ रोजी ८७.५०% शाळांमध्ये इको क्लबची स्थापना झालेली असून १२.५०% शाळांमध्ये इको क्लब स्थापन नसल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः छत्रपती संभाजीनगर (४४.१२%), नागपूर (३१.१९%), व पुणे (२९.६२%) या जिल्हयांतील शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन न केलेले दिसून येत आहेत. या कार्यालयाच्या पत्राद्वारे व आयोजित करण्यात आलेल्या V.C. द्वारे वारंवार सूचना देऊनही वरील जिल्हयांकडून इको क्लब स्थापन करण्याबाबत प्रगती दिसून येत नाही. तसेच उर्वरित जिल्हयांनीसुद्धा इको क्लब फॉर मिशन लाईफबाबतचे १०० % उद्दिष्टे पूर्ण करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करणेबाबत संबंधितांना कळविण्यात यावे.
यानुषंगाने आपणांस कळविण्यात, दि. ३१/०७/२०२६ पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शाळांमध्ये इको क्लब गंच स्थापन झालेले नाहीत अशा शाळांमध्ये प्राधान्याने इको क्लब मंचाची स्थापना करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देणेबाबत या कार्यालयाच्या संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते, तरी पुनःश्च आपणांस कळविण्यात येते की, दि. २७/०८/२०२६ पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन झालेले नाहीत अशा शाळांमध्ये प्राधान्याने इको क्लब मंचाची स्थापना करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात तसेच इको क्लब फॉर मिशन लाईफबाबतचे १००% उद्दिष्टे पूर्ण होईल, असे पाहावे.
‘एक पेड माँ के नाम ३.०’ या वृक्षारोपण मोहिमेची तिसरी आवृत्ती, ‘मिशन लाईफ साठी इको क्लब्सच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. हा कालावधी देशातील विविध कृषी-हवामान प्रदेशांमधील वृक्षारोपण हंगामाशी जुळणारा आहे. त्यानुसार, या मोहिमेअंतर्गत सन २०२६-२७ करिता एकूण ५३,०१,२५७ रोपवाटिकेचे लक्ष्य महाराष्ट्र राज्याकरिता देण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने ५० रोपे लावणे क्रमप्राप्त आहे. मागील वृक्षारोपण मोहिमांप्रमाणेच, वृक्षारोपणाची माहिती निर्धारित पोर्टलवर (https:// ecoclubs. education.gov.in/) अपलोड करावयाची आहे.
‘एक पेड माँ के नाम ३.०० या पोर्टलवरील दि. १७/०८/२०२६ रोजीच्या अहवालानुसार एकूण १,०८,०३५ शाळांपैकी ४६,६२९ शाळांकडून १९,१५.५३५ वृक्षारोपण करण्यात आलेले आहे, असे दिसून येते. उर्वरित शाळांना वृक्षारोपण करणेबाबत आदेश द्यावेत.
यानुषंगाने आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये उपरोक्त उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक प्रसार करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. मिशन लाइफसाठी शाळांमध्ये इको क्लब्सची व्याप्ती वाढवणे आणि विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक समुदाय यांचा जास्तीत जास्त सहभाग होईल










