दीक्षा पोर्टल वरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला मुदतवाढ देणेबाबत diksha portal ai sathi online course 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दीक्षा पोर्टल वरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला मुदतवाढ देणेबाबत diksha portal ai sathi online course 

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र क्र. IT/BROADCAST MEDIA १/२०२२४६७/२०२६. दि. १५/०७/२०२६.

२. CIET-NCERT यांचे पत्र दिनांक ०६/०७/२०२६.

संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी; “शिक्षकांसाठी AI साथी” हा ऑनलाईन कोर्स दीक्षा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार सदर कोर्समध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली होती आणि हा कोर्स पूर्ण करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कालावधी देण्यात आला होता.

सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (Machine Learning) यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रामधील AI चे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, AI चा जबाबदार, सुरक्षित व नैतिक (Responsible Al) वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AI चा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० तासांचे सतत व्यावसायिक विकास (CPD) प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने या ऑनलाईन कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.

संदर्भ क्रमांक २ नुसार या कोर्सला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी अंतिम दिनांक:

३० सप्टेंबर २०२६

कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम दिनांक :

३१ ऑक्टोबर २०२६

त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

कोर्स सुरू करण्यासाठी पूर्वतयारी

१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठी

(अ) DIKSHA App डाउनलोड करणे: Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये

नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी.

प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे. तसेच संबंधित पदनाम उपलब्ध नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढील अद्ययावतीकरणामध्ये आवश्यक पदनामांचा समावेश करता येईल.

(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणे :

प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store बरून DIKSHA Courses हे App डाउनलोड करावे.

त्यानंतर खालील लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये Enrol करावे.

कोर्स लिंक :

https://leaming.diksha.gov.in/diksha/course.php?id=१२५२&section=२८१४&modeActive-८२०२

२. Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी

Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login

अथवा नोंदणी करावी.

DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी.

Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये Al Saathi for Educators / शिक्षकांसाठी A साथी हा कोर्स शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून अथवा Explore Courses Tab वर क्लिक करून Filter courses वरून By Board मधील Maharashtra हा फिल्टर apply केल्यावर शिक्षकांसाठी A साथी हा कोर्स दिसेल त्यामध्ये प्रवेश घ्यावा.

कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करण्यास कळवावे. सदर बाबीस प्राधान्य देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांकडून विहित कालावधीत सदर कोर्स पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment