सूचना पत्र क्र. १४ सेवांतर्गत बी. एड. (P80) सन २०२६-२८ या तुकडीचे दिव्यांग, आजी / माजी सैनिक, अनाथ आणि सीमावर्ती समांतर आरक्षण प्रथम प्रवेश फेरी सूचना ycmou b.ed samantar aarakshan pravesh round 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना पत्र क्र. १४ सेवांतर्गत बी. एड. (P80) सन २०२६-२८ या तुकडीचे दिव्यांग, आजी / माजी सैनिक, अनाथ आणि सीमावर्ती समांतर आरक्षण प्रथम प्रवेश फेरी सूचना ycmou b.ed samantar aarakshan pravesh round 

सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२६-२८ या तुकडीसाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या प्रवेशेच्छुक अर्जदारांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची मूळ कागदपत्रे पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर करण्यात आली.

प्रथम कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र झालेल्या अर्जदारांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार दिव्यांग, आजी / माजी सैनिक / पत्नी /मुलगा / अविवाहित मुलगी, अनाथ आणि सीमावर्ती आरक्षण प्रवेशासाठी निवड यादी स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे. १) निवड यादीतील अर्जदारांनी त्यांचे प्रथम वर्षाचे शुल्क रू. २३,४२८/- (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २१ वर नमूद केल्याप्रमाणे) दिनांकः १०/०९/२०२६ रोजी रात्री ११.५९ PM पर्यंत आपला लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून स्वतःच्या लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने डेबिट/क्रेडीट कार्ड, नेटबँकिंग यूपीआय इत्यादीचा वापर करून भरावयाचे आहे. सदर प्रथम वर्ष शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय संबंधित अर्जदाराच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. प्रथम वर्षाचे शुल्क भरल्यानंतरच आपला बी. एड. शिक्षणक्रमाचा सन २०२६-२८ या तुकडीसाठी प्रवेश निश्चित होईल. अर्जदारांनी विहित मुदतीत प्रथम वर्ष शुल्क न भरल्यास संबंधित अर्जदार बी. एड. प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी. त्यामुळे बी.एड्. प्रवेशासाठी निवड झालेल्या अर्जदाराने वर दिलेल्या मुदतीतच प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

२) प्रथम वर्ष शुल्क यशस्वीपणे भरणाऱ्या अर्जदारांना आपल्या नोंदणीकृत मेल आयडीवर मिळेल. त्याच्या दोन प्रती काढून त्यातील एक प्रत आपल्या जिल्ह्यासाठी नियुक्त बी. एड. अभ्यासकेंद्रावर (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २३ ते २६ वर नमूद केलेल्या ठिकाणी) जाऊन जमा करावे. तसेच पुढील पत्रव्यवहारासाठी संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा व कायमस्वरूपी पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती अभ्यासकेंद्रावर देण्यात यावी.

३) अभ्यासकेंद्रामार्फत आपणास बी. एड. शिक्षणक्रमातील अध्ययन साहित्य प्रथम संपर्कसत्रात देण्यात येईल. वैकल्पिक अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि पूरक अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर Books: Free Download (PDF) या टॅबवर सॉफ्टकॉपीमार्फत PDF/E-book स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे याची नोंद घ्यावी.

४) अर्जदारांना बी. एड. २०२६-२८ प्रथम वर्ष शुल्क भरताना काही अडचण आल्यास कृपया ०२५३-२२३१७१४, २२३१७१५,२२३०१०६, २२३०५८० या क्रमांकावर (अर्ज माहिती / Login details सह) संपर्क साधावा.

Related posts:

Leave a Comment