वीर गाथा ६.० प्रकल्प राबिले बाबत veer gatha project paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वीर गाथा ६.० प्रकल्प राबिले बाबत veer gatha project paripatrak 

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.

५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

६. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.

७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./ न.पा.(सर्व)

वीर गाथा ६.० प्रकल्प राबविणेबाबत

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वीर गाथा ६.० हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Gallantry Awards Portal (GAP) अंतर्गत वीर गाथा प्रकल्पाची स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली. देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमिडिया) प्रकल्प सादर करता येतात. सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.

तसेच प्रत्येक शाळेत स्वतंत्र “वीर गाथा कॉर्नर” स्थापन करण्यात यावा. या कॉर्नरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व प्रतिभेला वाव देण्यात यावा. या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्यात यावे. तसेच उपक्रमांची उच्च दर्जाची (HD) छायाचित्रे आणि संबंधित माहिती/आकडेवारी जतन करून ठेवावी जेणेकरून भारत सरकारकडे (Gol) आवश्यकतेनुसार सादर करणे सोयीचे होईल.

राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation /Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.

शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.

विषय आणि वर्गवारी

इयत्ता विषय सूचक विषय

 

Related posts:

Leave a Comment