शालार्थ प्रणालीतून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर / ऑक्टोबर-२०२६ चे वेतन देयके अदा करणे बाबत shalartha pranali vetan deyak paripatrak
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ व शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अनुक्रमे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. या संचमान्यतेच्या आधारे ०१ एप्रिल २०२६ पासून संचमान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन एक स्तर अधिकारी यांच्या मान्यतेने काढण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या सुविधेचा उपयोग करून राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, डिजिटलायझेशन मधील कागदपत्रांची पूर्तता न करणारे, जन्मदिनांक व रुजू दिनांक यांचा प्रणाली वर चुकीच्या नोंदी असणे, संच मान्यते करिता वापरण्यात आलेला यु-डायस क्रमांक व शालार्थ प्रणाली मधील यु-डायस क्रमांक यात भिन्नता असणे, एका यु-डायस क्रमांकावर प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त डीडीओ कोड अस्तित्वात असणे, शाळा बंद होणे, संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसणे आणि न्यायालयीन प्रकरणाचे निर्देश इत्यादी कारणांमुळे मागील सहा महिन्यांमध्ये एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून देयकांना मान्यता देऊन देयके अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती. ०१ सप्टेंबर २०२६ पासून शालार्थ प्रणाली मधील संचमान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन अदा करता येणार नाही, तसेच इतर प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींमध्ये त्रुटी असल्यास वेतन अदा करता येणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
तथापि सद्यस्थितीत कामकाजाची व्याप्ती व दिवाळी, दसरा यासारख्या महत्त्वाच्या सणांचे दिवस असल्यामुळे पुढील बाबींची पूर्तता करण्याच्या अटींवर माहे सप्टेंबर २०२६ व माहे ऑक्टोबर २०२६ ची वेतन देयके एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांनी पुढील प्रमाणे शालार्थ प्रणाली मधील बाबीची पूर्तता माहे ऑक्टोबर-२०२६ अखेर पर्यंत करणे अनिवार्य असेल. संच मान्यता व शालार्थ मधील डीडीओ कोड यामधील यु-डायस क्रमांक भिन्न असल्यास तो एक सारखा करणे. शालार्थ प्रणाली मध्ये डिटॅच केलेल्या कर्मचाऱ्यांची योग्य माहिती नोंदविणे. शालार्थ प्रणाली मध्ये नमूद असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे एकही वेतन व भत्ते देय करण्यात आलेले नाही, आशा कर्मचाऱ्यांची सेवाविषयक बाबी पडताळून प्रणाली वरून त्यांची नावे कमी करणे, अतिरिक्त असणाऱ्या कर्मचारी समायोजित शाळेत अद्यापही रुजू झाले नसल्यास त्यांना रुजू करण्याची कार्यवाही करणे, डिजिटलायझेशन, जन्मदिनांक, रुजू दिनांक व अन्य काही तांत्रिक कारणास्तव कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणाली वरील त्रुटींची पूर्तता करणे इत्यादी त्रुटींची पूर्तता आपल्या स्तरावरुन तातडीने करण्यात यावी. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ पासून आणि अन्य काही कारणांमुळे संच मान्यतेत मधील मंजूर पदापेक्षा अधिकच्या पदांची वेतन देयके कोणत्याही परिस्थितीत अदा करता येणार नाही. त्यामुळे या प्रकारच्या सर्व त्रुटींची पूर्तता आपल्या स्तरावर विना विलंब करावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.










