“सेवा संकल्प अभियान २०२६” अंतर्गत राज्यस्तरीय महाविद्यालयीन भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शन आयोजित करणेबाबत drawing competition paripatrak
महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांकः एडीआर-२०२६/प्र.क्र.५६/CN १८७३२२३/तांशि-६, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२,
दिनांक:- ०८ ऑक्टोबर, २०२६.
संदर्भ :- संचालक, कला संचालनालय यांचे पत्र क्र. डिओओ-२०२६/तीन/१२८६, दि. २२ सप्टेंबर, २०२३.
प्रस्तावना :-
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनातर्फे दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “सेवा संकल्प अभियान २०२६” राबविण्याचा येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून कला संचालनालयामार्फत राज्यातील महाविद्यालयीन तरुण पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्याबाबत उपरोक्त संदर्भान्वये संचालक, कला संचालनालय यांनी प्रस्तावित केले आहे.
शासन निर्णय :-
कला संचालनालयातर्फे “सेवा संकल्प अभियान २०२६” या अभियानाचा भाग म्हणून राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या प्रस्तावास तसेच यासाठी रु. ६,५०,०००/- (अक्षरी रुपये सहा लाख पन्नास हजार फक्त) इतका खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
०२. श्री. विजय विष्णू बोंदर (विभाग प्रमुख, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) यांना स्पर्धा व प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. तसेच चित्रकला स्पर्धेसाठी प्रस्तावित करण्यात आल्याप्रमाणे परीक्षण समितीला मान्यता देण्यात येत आहे.
०३. प्रस्तावित राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी होणारा खर्च “महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ” यांच्या जमा निधीमधून भागविण्यात यावा.
०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१००८१५१६१५५६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,








