युनियन बँक ऑफ इंडियाचा सॅलरी अकांऊंट प्रस्ताव कॅसलेस वैदयकीय सुविधेसह union bank account cashless suvidha circular
संदर्भ :- युनियन बँक ऑफ इंडिया Ref: MUM: EBH: RDD/PR: 1 : 2026
महोदय / महोदया
उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सूचित करण्यात येते की युनियन बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकांऊंट प्रस्ताव कॅसलेस वैदयकीय सुविधा र.रू. 3,00,000/- (अक्षरी तीन लक्ष) प्रति वर्ष सादर केलेला आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी युनियन बँक ऑफ इंडिया ही ऐकमेव बँक असून ती राष्ट्रीयकृत बँक आहे.
सदर प्रस्तावानुसार कर्मचा-यांना वैदयकीय खर्चाची प्रतिपूर्ती देयक सादर करावे लागणार नाही. कर्मचाऱ्याने स्वतः खर्च करून वैदयकीय प्रतिपूर्तीचे देयक सादर केल्यास ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग आणि पर्यायाने महाराष्ट्र शासनाला प्रतिपूर्तीची रक्कम दयावी लागणार होती. सदर सुविधा लागू झाल्यास शासनाचा वैदयकीय प्रतिपूर्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. बँकेने सादर केलेली ही सुविधा कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियासाठी लागू असल्याने कुटुंबातील सर्वांना फायदा होणार आहे.
तेसच पूर्वीचे व्याधी / आजार असतानाही कॅशलेस सुविधा दिली जाणार आहे. तीन लक्षच्या पुढे वाढीव २ लक्ष पर्यंत जर कॅशलेस सुविधा हवी असल्यास प्रति महिना 200 रूपये आणि वाढीव 3 लक्ष पर्यंत सुविधा हवी असल्यास 300 रूपये प्रति महिना वाढीव 4 लक्ष पर्यंत सुविधा हवी असल्यास 400 रूपये प्रति महिना रक्कम भरून मिळू शकते.
सॅलरी अकांऊंट ही कर्मचा-याची वैयक्तीक बाब असली तरी उपरोक्त बाबींचा विचार करता अधिकाधिक अधिकारी व कर्मचारी यांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आपल्या स्तरावरून सुचित करावे, आणि वेतन खाते उघडण्यास युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना उचित सहकार्य करावे, ही विनंती आहे.











