“सुईचे झाड” मराठी बोधकथा marathi bodhkatha
सुईचे झाड
दोन भाऊ एका जंगलाजवळ राहत असत. या दोघांपैकी मोठा भाऊ लहान भावाशी खूप वाईट वागायचा. एके दिवशी मोठ्या भावाने ठरवले, की जवळच्या जंगलात जाऊन लाकडे तोडून आणावीत आणि नंतर पैशासाठी बाजारात नेऊन ती विकावीत. त्याने अनेक झाडे तोडली. झाडे तोडताना तो एका ‘जादुई सफरचंदाच्या’ झाडाजवळ येऊन थांबला. त्या झाडाला सोन्याचे सफरचंद लागले होते. झाड त्याला म्हणाले, “अरे, कृपा करून मला कापू नकोस. तू मला जर सोडून दिलेस तर, मी तुला सोन्याची सफरचंदे देईन.” पण त्याच्या मनात लोभ जागृत झाला. त्याने झाडाला धमकावले, “जर तू मला तुझी सगळी सोन्याची सफरचंदे दिली तर ठीक, अन्यथा मी तुला मुळापासून कापून टाकेल!” अशा स्थितीत सफरचंद देण्याऐवजी झाडाने त्याच्यावर सुर्याचा वर्षाव केला. त्यामुळे मोठा भाऊ वेदनेने जमिनीवर पडून रडू लागला. आता हळूहळू दिवस मावळायला लागला होता. धाकट्या भावाला थोरल्या भावाची काळजी वाटू लागली, म्हणून तो त्याच्या शोधात जंगलात गेला.
त्याला त्याचा मोठा भाऊ झाडाजवळ वेदनांनी ग्रासलेला दिसला. त्याच्या शरीरात शेकडो सुया घुसल्या होत्या. भावांकडे • गेल्यावर त्याने हळूहळू प्रेमाने प्रत्येक सुई काढायला सुरुवात केली. या सर्व गोष्टी ते झाड मोठ्या कौतुकाने पाहत होते. आतापर्यंत मोठ्या भावाला आपली चूक लक्षात आली होती. मोठ्या भावाने लहान भावाची त्याच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल माफी मागितली. यापुढे तुझ्याशी दुष्टपणे वागणार नाही, असे वचन दिले. झाडाने मोठ्या भावाच्या हृदयात झालेला बदल पाहिला आणि त्या दोघांना आपल्याकडील सर्व सोन्याची सफरचंदे भेट म्हणून दिली.










1 thought on ““सुईचे झाड” मराठी बोधकथा marathi bodhkatha”